लॉकडाउनदरम्यान नेटफ्लिक्स मनोरंजनाचा अड्डा बनला आहे. वेब सीरिजनंतर आता लवकरच बॉलिवूडचे सिनेमेही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत. अशात कंपनी सतत नवनवीन स्वस्त प्लॅन्सची घोषणा करत आहे.

लेटेस्ट रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स सध्या भारतात 349 रुपयांच्या नवीन “Mobile+” प्लॅनची टेस्टिंग घेत आहे. याद्वारे हाई-डेफिनेशन (HD) व्हिडिओचा अॅक्सेस केवळ मोबाइलवरच नव्हे तर PC, Mac आणि Chromebook वरही मिळेल. पण, हा प्लॅन एकावेळेस फक्त एकाच युजरला वापरता येणार आहे.

“कोणालाही स्मार्टफोनवर नेटफ्लिक्सचा आनंद घेता यावा यासाठी आम्ही भारतात मोबाइल प्लॅनची सुरूवात केली आहे. जर युजर्सचा ऐड चॉइस [मोबाइल+ प्लॅन] ला चांगला प्रतिसाद असेल तरच हा प्लॅन आम्ही जास्त काळासाठी रोलआउट करू”, असे कंपनीकडून या प्लॅनबाबत माहिती देताना सांगण्यात आले आहे.

हा प्लॅन “Mobile+” नावाने असला तरी युजर्स नेटफ्लिक्स कॉम्प्युटरवरही बघू शकतील. मोबाइल+ एकाच व्यक्तीच्या वापरासाठी आहे. या प्लॅनवर एकापेक्षा जास्त व्यक्तींना नेटफ्लिक्सचा वापर करता येणार नाही. टेस्टिंगसाठी सध्या हा 349 रुपयांचा प्लॅन काही निवडक युजर्ससाठीच उपलब्ध करण्यात आला आहे.