News Flash

दह्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ ५ गोष्टींचे सेवन

दही खाल्याने अनेक फायदे होतात. मात्र, काही पदार्थ आहेत जे दह्यासोबत खाल्यास हानिकारक ठरू शकतात.

दह्यासोबत चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन (Photo Credit - File Photo)

आपल्या आहारात दह्याचा समावेश करा असं आपल्याला नेहमी सांगण्यात येतं. कारण दही खाल्याने अन्न पचन होण्यास मदत होते. दही खाल्याने आतडे निरोगी राहतात. परंतु असे काही पदार्थ आहेत जे दह्यासोबत खाल्यास हानिकारक ठरू शकतात. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ दह्या सोबत खाल्ले नाही पाहिजे.

१. तळलेले पदार्थ
तेलात आणि तूपात बनवलेले पदार्थ उदा. भजी, तळलेलं पनीर दहीसोबत खाऊ नये. यामुळे पचन क्रिया मंदावते. एवढंच नाही तर यामुळे आळसपणा येऊ शकतो.

२. मासा
आयुर्वेदानुसार प्रोटीनचे स्त्रोत असलेल्या दोन गोष्टी एकावेळी खाणे टाळा. मासा आणि दह्यात प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. तर, एकावेळी या दोन्ही गोष्टी खाल्याने अपचन होतं आणि त्वचे संबंधीत समस्या उद्भवू शकतात.

३. दूध
दूध आणि दही एकत्र खाल्यास अॅसिडिटी, अतिसार आणि सज येऊ शकते. या दोघांमध्ये प्रोटीनसोबत फॅट्सचे प्रमाण ही जास्त असते. म्हणून, एकाच वेळी हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणे टाळायला हवे.

४. आंबा
दही आणि आंब्याला एकत्र करून अनेक पदार्थ बनवले जातात. अनेकांना आंबा आणि दह्याचे पदार्थ खायला आवडतात. मात्र, आंबा खाल्यानंतर, दही खाल्यानंतर किंवा या दोघांना एकत्र करून बनवण्यात आलेले पदार्थ खाल्यास तुमच्या शरीरात विष निर्माण होऊ शकते. याशिवाय त्वचे संबंधीत अॅलर्जी देखील होऊ शकते.

५. आंबट फळे
दह्यासोबत आंबट फळे खाणे टाळा. या दोघांचे एकत्र सेवन केल्याने पचन प्रक्रिया मंदावते. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि अतिसार सारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 3:07 pm

Web Title: never eat this foods with curd it can be harmful for your health dcp 98
टॅग : Lifestyle
Next Stories
1 फसवणुकीची ‘लिंक’
2 VIDEO: लाँग कोविड म्हणजे काय? तो अधिक धोकादायक आहे का?
3 पावसाळ्यात वाहनांची सुरक्षा
Just Now!
X