पावरफुल बाइक अशी ओळख असलेली बजाजची Dominar 400 ही बाइक लवकरच नवीन अपडेटसह लाँच होणार आहे. या बाइकचे फोटो गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. आता या बाइकच्या फीचर्सबाबत नवी माहिती समोर आली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये ही बाइक लाँच केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च महिन्यात ही बाइक लाँच होऊ शकते अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या बाजारात असलेल्या Dominar पेक्षा नव्या मॉडलची किंमत 15 ते 20 हजार रुपये जास्त असण्याची शक्यता आहे. या बाइकची एक्स शोरुम किंमत जवळपास 1.65 लाख रुपये असू शकते. मात्र, अद्याप कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

फीचर्स –
नव्या बाइकमध्ये मोठा आणि अपडेटेड इंस्ट्रुमेंटल कंसोल आहे. 2019 Bajaj Dominar 400 मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क्सऐवजी इनव्हर्टेड फॉर्क्स देण्यात आलेत. बाइकमध्ये मोठा बदल एग्जॉस्टमध्ये करण्यात आला आहे. आता ट्विन पोर्ट एग्जॉस्ट सेटअप देण्यात आला आहे. नव्या एग्जॉस्टमुळे आवाजातही बदल झाला आहे. याशिवाय बाइकच्या इंस्ट्रुमेंट क्लस्टरमध्येही बदल करण्यात आला आहे. आता यामध्ये साइड स्टँड पोझिशन ते सर्व्हिस रिमाइंडर, इंजिन किल स्विच ऑन/ऑफ, अॅव्हरेज फ्युअल एफिशिअंसी यांसारख्या सेवा मिळतील. बाइकच्या पेट्रोलच्या टाकीजवळ गिअर पॉझिशन इंडिकेटर देण्यात आलं आहे. त्याच स्क्रिनवर ओडोमीटर आणि ट्रिप मीटरदेखील आहे. बाइकच्या इंजिनमध्ये कोणताच बदल करण्यात आला नसल्याचं समजतंय. 2019 Bajaj Dominar मध्ये 373 सीसी लिक्विड-कूल्ड फ्युअल-इंजेक्टेड सिंगल सिलेंडर इंजिन असू शकतं.