News Flash

मधुमेह नियंत्रणासाठी स्मार्टफोनवर आधारित उपचारपद्धती

व्हर्जिनिया विद्यापीठातील वैज्ञानिकांचे संशोधन

| January 18, 2016 01:24 am

व्हर्जिनिया विद्यापीठातील वैज्ञानिकांचे संशोधन
मधुमेहींसाठी आता स्मार्टफोन अ‍ॅपवर आधारित उपचारपद्धती विकसित करण्यात आली आहे. त्यात रक्तातील साखर वाढल्यानंतर ती लगेच नियंत्रित केली जाते. स्मार्टफोन व शरीरावर धारण करता येईल असा इन्सुलिन पंप यांचा वापर त्यात आहे. स्वादुपिंडातील रक्तशर्करेचे प्रमाण वाढताच इन्सुलिन पंप कार्यान्वित होतो व इन्सुलिन शरीरात सोडले जाते. ही प्रणाली चाचणी स्तरावर असून आता शेवटचे दोन टप्पे राहिले आहेत.
आम्ही या कृत्रिम स्वादुपिंडावर संशोधन करीत असून ते काम २००६ पासून हाती घेतले आहे, असे व्हर्जिनिया विद्यापीठातील मधुमेह तंत्रज्ञान विभागाचे संचालक बोरिस कोवाटचेव यांनी सांगितले. रक्त ग्लुकोज संवेदक यांचा वापर यात केला जातो व एक फ्लॅश ड्राइव्ह शरीरात लावला जातो. तो हात, पाय व पोटावर अशा तीन ठिकाणी लावतात, असे एआरएस टेक्निकाचे वृत्त आहे.
संवेदक रक्तशर्करेची पातळी दर पाच मिनिटांनी मोजतो. बिनतारी पद्धतीने त्याची माहिती अ‍ॅपला दिली जाते. हे अ‍ॅप अर्थातच अँड्रॉइड स्मार्टफोनवर असते. त्यातील सूचनांप्रमाणे इन्सुलिन पंप सुईतून रक्तात इन्सुलिन सोडतो. पारंपरिक पद्धतीत कोवाटचेव यांचे मूळ स्मार्टफोन अ‍ॅप सध्या वापरले जाते व त्यात रक्तशर्करेचे प्रमाण कळते. त्यामुळे साखर कमी किंवा जास्त झाली तरी कळते, मानवी पातळीवर ते मोजत बसावे लागत नाही. म्हणजेच ही स्वयंचलित यंत्रणा आहे.
त्याची सुधारित आवृत्ती आता तयार के ली असून त्यात रक्तशर्करेच्या आकडय़ांना फार महत्त्व नसून कुठल्या भागात साखर वाढते आहे हे कळते. रुग्णानुसार यात रक्तशर्करेची पातळी योग्य-अयोग्य सांगितली जाते. हार्वर्डच्या पॉलसन स्कूल ऑफ इंजिनीयरिंग अँड अप्लाईड सायन्सेसचे फ्रान्सिस डॉयल यांनी सांगितले की, नेहमीचे समायोजन यात करावे लागत नाही. नवीन आज्ञावलीत प्रत्येक रुग्णानुसार रक्तशर्करा व इन्सुलिन संवेदनशीलतेचा विचार केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2016 1:24 am

Web Title: new apps launch on smartphone which is help to control diabetes
Next Stories
1 पोलिओ उच्चाटनाचे प्रयत्न सर्वकष करण्याची गरज
2 भारत-मालदीवमध्ये आरोग्य क्षेत्रातील करार
3 अ‍ॅसिडिटीची औषधे मूत्रपिंडाला बाधक
Just Now!
X