14 December 2017

News Flash

रक्ताच्या कर्करोगावर नवीन औषध

हे औषध खराब झालेल्या पेशींना मारून टाकते

पीटीआय, लंडन | Updated: August 10, 2017 1:19 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

संशोधकांनी नव्याने एक औषध तयार केले असून ज्या रुग्णांना रक्ताचा कर्करोग झाला आहे, त्यांच्यासाठी हे औषध फायदेशीर ठरण्यास मदत होणार आहे.

‘एचएक्सआर९’ असे या औषधाचे नाव असून यामध्ये कर्करोगाच्या पेशींची होणारी वाढ थांबवली जाते. हे औषध आरोग्यदायी नसलेल्या आणि खराब झालेल्या पेशींना मारून टाकण्याचे काम करते.

ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले. तीव्र मायलॉईड ल्युकेंमिया (एएमएल) वर उपचार करण्यासाठी हे औषध फायदेशीर ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

हे औषध विशिष्ठ जनुकाला लक्ष्य करते. त्यास एचओएक्स असे म्हणतात. ते पेशीची जलद वाढ रोखण्यास कारणीभूत ठरते. प्रौढामध्ये ही वाढ थांबली जाते. कर्करोगामध्ये सामान्य वाढीच्या तुलनेत अधिक जलदपणे पेशींची वाढ घडून येते. तसेच यामध्ये पेशींचे विभाजनहीअतिशय जलदपणे होते.

तीव्र मायलॉईड ल्युकेंमिया हा घातक आजार आहे. तो अनेक औषधांना प्रतिसाद देत नाही. मात्र नव्याने तयार करण्यात आलेले औषध या आजारमध्ये पेशींची होणारी वाढ आणि विभाजन रोखते, असे संशोधकांनी सांगितले.

संशोधकांनी २६९ एएमएलवर उपचार करणाऱ्या रुग्णांचा अभ्यास केला. यामध्ये एचओएक्स जनुक आणि रुग्णाचा अस्तित्व दर काढण्यात आला. यानंतर या रुग्णांना एचएक्सआर९ हे औषध देण्यात आले. त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यात काही प्रमाणात यश आल्याचे दिसून आले. हे संशोधन ऑन्कोटार्गेट या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

First Published on August 10, 2017 1:19 am

Web Title: new medicine on blood cancer 2