एका महत्वपूर्ण संशोधनामध्ये शास्त्रज्ञांनी उच्च रक्तदाबावर मात करणाऱ्या नव्या उपचार पध्दतीचा शोध लावला आहे. मानसाच्या शरीरातील केवळ धान्याच्या आकारा एवढा ‘ग्रीवा पिंड’ हा अवयव काढून टाकल्यास मानवी आयुष्य मंदगतीने कमी करणाऱ्या उच्च रक्तदाबावर मोठ्या क्षमतेने उपचार करता येणे शक्य होणार आहे.
हृदयाकडे रक्त नेणाऱ्या धमनीच्या कडेला तांदळाच्या आकारा एवढा ‘ग्रीवा पिंड’ हा अवयव उच्च रक्तदाब वाढवणाऱ्या घटकांपैकी एक आहे. मेंदूला जोडलेले ‘ग्रीवा पिंड’ काढून उच्च रक्तदाब कमी करण्यात ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या संशोधकांना यश आले आहे.
“शरिराचा हा लहानसा अवयव अतिरक्तदाबा दरम्यान वेगवेगळ्या प्रकारे काम करतो. मात्र, रक्तदाब वाढवण्यात त्याचा नक्की किती सहभाग आहे हे रंजक आहे”, असे ब्रिस्टॉल शरीरविज्ञान  संस्थेचे प्राध्यापिका ज्यूलियन पॅटन म्हणाल्या.
सामान्यपणे ‘ग्रीवा पिंड’ रक्तामध्ये ऑक्सिजन आणि कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण नियमीत करण्याचे काम करतात. रक्तातील ऑक्सिजनची पातळी खालावल्यावर ‘ग्रीवा पिंड’ उत्तेजित होतात. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण स्थिर होई पर्यंत श्वासोच्छवासाची गती वाढून रक्तदाब वाढतो.
“आकाराने जरी ‘ग्रीवा पिंड’ लहान आसले तरी या अवयवामधून शरिरातील इतर कोणत्याही अवयवांच्या तुलनेमध्ये वेगाने रक्त प्रवाहीत होत असते. मेंदूला होणाऱ्या रक्त पुरवठ्याचा दाब कायम ठेवण्याचे काम ग्रीवा पिंड करते”, असे पॅट पुढे म्हणाल्या.
नेचर कम्यूनिकेशन या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिध्द करण्यात आले आहे.