वनप्लसने गेल्या आठवड्यात भारतात U आणि Y सीरिजअंतर्गत नवीन अँड्रॉइड टीव्ही भारतात लाँच केले. या नवीन टीव्हीच्या विक्रीसाठी कंपनीने पहिला फ्लॅश सेल आयोजित केला होता. सेलमध्ये या टीव्हीला ग्राहकांचा शानदार प्रतिसाद मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे. सेल सुरू झाल्यानंतर अवघ्या एका मिनिटात सर्व टीव्हींची विक्री झाल्याची माहिती कंपनीने ट्विटरद्वारे दिली आहे.

फीचर्स आणि किंमत :-
कंपनीने 2 जुलै रोजी 55 इंच 4K मॉडेल, 43 इंच फुल HD मॉडेल आणि 32 इंच HD मॉडेलचे तीन टीव्ही लाँच केले. हे टीव्ही अँड्रॉइड 9 Pie सिस्टिमवर कार्यरत असून यामध्ये OxygenPlay नावाचं वनप्लस कस्टमाइज्ड कंटेंट रिकमंडेशन इंटरफेस दिलं आहे. या नव्या टीव्ही सीरिजची बेसिक किंमत 12,999 रुपये आहे.

वनप्लस Y सीरिजमध्ये दोन मॉडेल तर U सीरिजमध्ये एक मॉडेल कंपनीने आणलं आहे. U सीरिजमधील 55 इंचाचा मोठा डिस्प्ले असलेला टीव्ही या रेंजमधला टॉप मॉडेल आहे. यात वनप्लस सिनेमॅटिक व्ह्यू फीचर देण्यात आलं आहे. 49,999 रुपये इतकी या टीव्हीची किंमत आहे. OnePlus TV Y सीरिज ही बजेट सेगमेंटमधील ग्राहकांचा विचार करुन आणली आहे. यामध्ये 32 इंच आणि 43 इंचाचे दोन मॉडेल्स आहेत. यात ऑक्सीजन प्ले, वनप्लस कनेक्ट आणि अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. याशिवाय टीव्हीमध्ये आधीपासूनच काही प्री-लोडेड व्हिडिओ अॅप्सही आहेत. 32 इंच मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. तर, 43 इंच मॉडेलची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. वनप्लसने यापूर्वी लाँच केलेल्या टीव्हीपेक्षा नव्या सीरिजमधील टीव्ही तुलनेने स्वस्त आहेत. कमी किंमतीमुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.