सोशल मीडियामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेल्या आणि अतिशय कमी कालावधीत प्रसिद्ध झालेल्या फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी आणखी एक नवीन पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. ग्राहकांचा वापर जास्तीत जास्त सोपा व्हावा यादृष्टीने कंपनी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसते. नुकताच फेसबुकने ‘स्नूझ’ हा नवा ऑप्शन ग्राहकांसाठी खुला केला आहे.  या पर्यायामुळे सुमारे दोन बिलियन ग्राहकांना नको असलेल्या पेज, मित्रांकडील नोटिफिकेशन्स बंद करता येणार आहेत. त्यामुळे पूर्वी आपण लोकांना ब्लॉक करायचो तसे ब्लॉक करावे लागणार नाही.

यामध्ये नको असलेली नोटिफिकेशन तुम्ही ३० दिवसांसाठी दूर ठेवू शकणार आहात. यामुळे आता आपल्याला कोणालाही अनफॉलो करण्याची आवश्यकता नाही. या मित्राला तुम्ही ३० दिवसांसाठी दूर ठेवू शकता. आता हा ऑप्शन नेमका कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर कोणत्याही  पोस्टच्या उजव्या बाजूला तीन डॉटस असतात. त्यावर क्लिक केल्यावर डाऊन ऑप्शनमध्ये ‘स्नूझ’ हा पर्याय असेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या व्यक्ती, पेज, ग्रुप  यांच्या मेसेजपासून सुटका मिळवू शकता. म्हणजेच त्या व्यक्तीचे किंवा ग्रुपचे मेसेज तुम्हाला तुमच्या वॉलवर दिसणार नाहीत.  फेसबुकने यापूर्वीदेखील अनफॉलो, हाईड, सी फर्स्ट, रिपोर्ट असे ऑप्शन दिले होते. मात्र आता ‘स्नूझ’ ऑप्शनमुळे नवा पर्याय खुला झाला आहे.