स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये अतिशय अल्पावधीत आपले स्थान निर्माण करणाऱ्या शिओमी कंपनीच्या फोनला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. आपल्या एमआय नोट ४, ५ एस प्लस या फोननंतर कंपनीने आता एमआय ६ प्लस फोन लॉंच केला आहे. उत्तम रॅम असलेला हा फोन कसा असेल याबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र शिओमीच्या आधीच्या फोनप्रमाणेच अतिशय आकर्षक फिचर्स असलेला एमआय ६ प्लस हा फोनदेखील ग्राहकांना भुरळ घालण्याची शक्यता आहे. याआधीही शिओमीकडून चांगले रॅम असलेले फोन बाजारात आणले होते आणि त्याला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसादही दिला होता. काय आहेत या फोनची नेमकी फिचर्स

१. रॅम – ६ जीबी
२. बॅटरी – ४ हजार एमएएच क्षमता
३. प्रोसेसर – स्नॅपड्रॅगन ८०० सिरीज
४. कॅमेरा – २२ मेगापिक्सल
५. बॉडी – ३ डी ग्लास

शिओमीचा फोन ग्राहकांच्या खिशालाही परवडणारा असल्याने ग्राहक हा फोन खरेदी करताना दिसत आहेत. याआधी कंपनीचे फोन केवळ ऑनलाईनच उपलब्ध होते मात्र आता हे फोन बाजारातही खरेदी करता येत आहेत. याआधी हा फोन केवळ विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेला खरेदी करावा लागत असे. अनेकदा हा फोन अतिशय कमी वेळात आऊट ऑफ स्टॉक होत असल्याने ग्राहक निराश होत होते. यावर उपाय म्हणून कंपनीने आता या फोनचे प्रीबुकींगही सुरु केले आहे. कंपनीच्या Mi.com या ऑफीशियल वेबसाईटवर ग्राहकांना हे बुकींग करता येणार आहे.