24 September 2020

News Flash

सावधान..! लठ्ठपणामुळे १३ प्रकारच्या कर्करोगाचा धोका

कर्करोग होण्याची शक्यता ४० टक्केंनी वाढली आहे.

सध्या अनेक व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त आहेत. लठ्ठपणा कर्करोगाला आमंत्रण देतो. यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (CDC) च्या संशोधकांनी असा दावा केला आहे. लठ्ठपणामुळे एक नव्हे १३ प्रकराच्या कर्करोगाचा धोका असल्याचे त्यांना अभ्यासात आढळले आहे. जसजशा तुमच्या शरीरात फॅट सेल्स वाढत जातात, तसतशी तुमची श्वास घेण्याची क्षमता कमी होते. मेटाबॉलिज्म स्तर बदलू लागतो तसेच इंन्सुलिन वेगाने वाढू लागतो आणि हार्मोन्सचं नियंत्रण बिघडतं. या सर्व कारणांमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो असे अभ्यसात आढळले आहे.

सीडीसीने यासाठी ६० हजार लठ्ठ व्यक्तींची तपासणी केली. ज्यामध्ये त्यांना १३ वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आढळून आलेत. ज्यात ब्रेन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, थायरॉइड कॅन्सर, गॉल ब्लाडर कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, पॅनक्रियाज कॅन्सर, कोलोन कॅन्सर, यूट्र्स कॅन्सर, ओवरीज कॅन्सर यांचा समावेश होता.

(आणखी वाचा : लठ्ठ आहात? अशी करा व्यायामाला सुरुवात)

आजकालची बदलती जीवनशैली, खानपानाच्या पद्धती, ठराविक सवयी, अस्वछ वातावारणामुळे उद्भवणारी इन्फेक्शन, निसर्गातील प्रदूषण, अतिप्रमाणात हार्मोन्स शरीरामध्ये घेणे, आणि लठ्ठपणा काही अंशी कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. गेल्या काही वर्षांमध्ये लठ्ठपणामुळे कर्करोग होण्याची शक्यता ४० टक्केंनी वाढली आहे. इतकेच नव्हे जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला एक नाही तर तब्बल १३ प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका अनेक टक्क्यांनी वाढतो.

इतर आजारांचा धोका वाढतो
केवळ शरीर बेढव दिसणे एवढय़ावरच लठ्ठपणाचा उपद्रव थांबत नाही. व्यक्ती जितकी जास्त लठ्ठ असेल, तितका तिला होऊ शकणाऱ्या इतर आजारांचा धोका वाढत जातो आणि ही बाब अधिक चिंताजनक आहे. मधुमेह, रक्तदाबाच्या तक्रारी, पित्ताशयाच्या पिशवीत खडे होणे, मूत्रपिंडाचे विकार, गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी, पक्षाघात (स्ट्रोक) हे त्रास उद्भवण्याची शक्यता लठ्ठपणामुळे वाढते. अतिवजनामुळे श्वास घेण्यावरही परिणाम होतो. काही लठ्ठ व्यक्तींना झोपेत एकदम श्वास बंद होण्याची आणि श्वास अडकल्यामुळे दचकून जाग येण्याची तक्रार (स्लीप अ‍ॅप्निया) असते. स्तनांचा कर्करोग, ओव्हरीजचा तसेच मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग याचा धोकाही लठ्ठ व्यक्तींना अधिक असतो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 12:00 pm

Web Title: new study says that obesity increases the risk of not one but 13 types of cancer
Next Stories
1 स्मार्टफोननंतर आता शाओमीचे ‘स्मार्ट बूट’
2 तंत्रज्ञानाने रुग्णवाहिकेला अपघाताचे ठिकाण कळणे शक्य
3 World Cancer Day : महिलांनो आरोग्याच्या या समस्या आहेत? तर तुम्हालाही होऊ शकतो कर्करोग 
Just Now!
X