29 November 2020

News Flash

अतिरिक्त घामावर नवीन उपचारपद्धती

उन्हाळ्यात अति श्रम केल्याने आपल्याला खूप घाम येतो.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अतिरिक्त घाम येणे या समस्येवर नव्या उपचारपद्धतीला अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. ग्लायकोपायरेनियम  किंवा क्यूब्रेक्सझा असे या औषधी कापडाचे नाव असून ते हायपरहायड्रोसिस (अति घाम येणे) या विकारावर उपचारांसाठी गुणकारी आहे.

उन्हाळ्यात अति श्रम केल्याने आपल्याला खूप घाम येतो. पण अनेक लोकांना नेहमीच्या वातावरणातही अधिक घाम येण्याची समस्या असते. त्याला हायपरहायड्रोसिस (अति घाम येणे) असे म्हणतात. एकटय़ा अमेरिकेत १० दशलक्ष नागरिकांना त्यांची बाधा आहे. त्यांच्यासाठी समाजात वावरणे अवघड होऊन बसते. घामाने भिजलेले कपडे आणि दरुगधी यांमुळे मुक्तपणे वावरणे अवड होते. यावर टाल्कम पावडर, बॉडी स्प्रे आदी उपाय केले जातात. पण पुरेसे उपयोगी नसतात.

ग्लायकोपायरेनियम किंवा क्यूब्रेक्सझा ही उपचारपद्धती त्यावर गुणकारी असल्याचे अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. तो एक लहानसा औषधीयुक्त कापडाचा तुकडा असून तो जेथे घाम अधिक येतो त्या शरीराच्या भागावर दिवसातून एकदा वापरायचा आहे. शरीराचा तो बाग दिवसातून एकदा पुसला की घाम कमी येतो. मुळात ते एक अ‍ॅण्टिकोलायनर्जिक द्रव्य असून ते शरीरातील चेतासंस्थेमधील काही न्यरोट्रान्समिटरवर कार्य करते. त्याने घाम उत्पन्न करणाऱ्या ग्रंथींवर परिणाम होऊन घाम कमी येतो. ही उपचारपद्धती ९ वर्षांवरील व्यक्तींच्या वापरास सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2018 12:49 am

Web Title: new treatment on extra sweat
Next Stories
1 लांब आणि घनदाट केसांसाठी या गोष्टी आवर्जून करा
2 टाटा मोटर्सने आणल्या ग्राहकांसाठी विशेष मॉन्सून ऑफर्स
3 ट्रू कॉलर वरुनही करता येणार कॉल रेकॉर्डिंग
Just Now!
X