21 September 2018

News Flash

एचआयव्हीच्या उपचारांसाठी नवी लस

भविष्यात या घातक संसर्गास आळा घालण्यास मदत होऊ शकते.

प्रतिनिधिक छायाचित्र

एचआयव्हीच्या विविध प्रकारांविरोधात सुरक्षित आणि परिणामकारक रीतीने प्रतिकार शक्ती निर्माण करणारी लस संशोधकांनी विकसित केली आहे. यामुळे भविष्यात या घातक संसर्गास आळा घालण्यास मदत होऊ शकते.

HOT DEALS
  • Moto Z2 Play 64 GB Lunar Grey
    ₹ 14705 MRP ₹ 29499 -50%
    ₹2300 Cashback
  • Sony Xperia L2 32 GB (Gold)
    ₹ 14845 MRP ₹ 20990 -29%

एचआयव्हीच्या विविध प्रकारच्या रोगजंतूंना एकत्र करून तयार केलेली लस निरोगी प्रौढांमध्ये परिणामकारक रोगप्रतिकारक प्रतिसाद निर्माण करीत असल्याचे अमेरिकेतील हारवर्ड वैद्यकीय विद्यालयातील संशोधकांना आढळले. या अभ्यासात समोर आलेले निकाल हे निश्चितच एचआयव्ही उपचारांत मैलाचा दगड आहेत, असे डॅन बारौच यांनी सांगितले. हा अभ्यास लॅन्सेट जर्नल या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. मोसेक एडी२६, एडी२६प्लस जीपी१४० या लसीमुळे मनुष्य आणि माकडांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढत असल्याचे बारौच यांनी सांगितले. जगभरात ३७ दशलक्ष लोकांना एचआयव्ही/एड्स आहे. यामध्ये दरवर्षी सुमारे १.८ दशलक्ष नव्या प्रकरणांची भर पडते. याला आळा घालण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रभावी प्रतिबंधात्मक लस असणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. वैद्यकीय चाचण्या आणि चाचण्यापूर्व अभ्यासांमध्ये आढळणारी थेट तुलनात्मक कमतरता ही एचआयव्हीविरोधात प्रभावी लस विकसित करण्याच्या मार्गातील मुख्य अडचण आहे. यासाठी पूर्व आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि अमेरिकेमधील १२ वैद्यकीय केंद्रांतील १८ ते ५० वयोगटातील ३९३ निरोगी, एचआयव्ही संसर्ग झालेल्या लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. चाचणीत सहभागी झालेल्या लोकांना ४८ आठवडय़ांच्या कालावधीत चार लसी देण्यात आल्या. प्रत्येक व्यक्तीला एडी२६.मॉस.एचआयव्ही ही लस अभ्यासाच्या सुरुवातीला आणि १२ आठवडय़ांनी देण्यात आली. यावेळी लस एचआयव्ही विरोधात प्रभावी प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यात यशस्वी असल्याचे आढळले.

First Published on July 13, 2018 12:58 am

Web Title: new vaccine on hiv 2