27 February 2021

News Flash

बुटांच्या जगातही डिजीटल युग ! Nike चे ऑटोमॅटिक फिटिंग Smart शूज

या बुटांची वैशिष्ट्य ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल, पाहा व्हिडीओ

क्रीडा क्षेत्रातील साहित्य बनवणारी दिग्गज कंपनी Nike ने स्मार्ट बूट लाँच केले आहेत. या बुटांची वैशिष्ट्य ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. बुटांमध्ये सेंसर असल्यामुळे पाय बुटात टाकताच पायाच्या आकारानुसार हे बूट आकार बदलतात. म्हणजे पायांचा आकार कसाही असला तरी हे बूट पायात अगदी फिट बसणार.

Nike Adapt BB असं या बुटांचं नाव असून एका मोबाइल अॅपद्वारे ते कार्यरत असणार आहेत. हे बूट लाँच करुन Nike कंपनीने बुटांच्या जगतात डिजीटल युगाची सुरूवात केली असल्याचं म्हटलं जातंय. विशेषतः खेळाडूंच्या मागणीनुसार या बुटांची निर्मीती केली असल्याचं कंपनीने सांगितलंय. पायाला योग्य फिटींग आणि वारंवार लेस बांधण्याची कटकट नसावी अशाप्रकारची मागणी खेळाडूंकडून केली जात होती. तीच त्यांची सर्वात मोठी अडचण होती, म्हणून हे बूट आणले आहेत असं कंपनीने म्हटलंय.


एका स्मार्टफोनच्या सहाय्याने हे बूट कंट्रोल करता येणार आहेत. जर बूट जास्त फिट झालेत असं तुम्हाला वाटलं तर अॅपच्या मदतीने तुम्ही ते सैल करु शकतात किंवा जर तुम्ही बूट ऑटोमॅटिक फिटिंग मोडवर ठेवल्यास सेंसरमुळे पायाच्या आकारानुसार आपोआप ते फिट होतील.
17 फेब्रुवारी 2019 पासून या बुटांची विक्री सुरू होईल. माध्यमांतील वृत्तानुसार 350 अमेरिकी डॉलर इतकी या बुटांची किंमत आहे. म्हणजे भारतात जवळपास 25 हजार रुपयांच्या दरम्यान या बुटांची किंमत असेल अशी शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 5:22 pm

Web Title: nike unveils next generation self lacing shoe nike adapt bb
Next Stories
1 मधुमेह आणि स्थूलता अनुवंशिक आहे?
2 भारतीयांना कोणत्या रंगाच्या कार आवडतात माहितीये ?
3 5 हजारांत बुकिंग सुरू, होंडाची नवी ‘सीबी 300 आर’
Just Now!
X