निसान इंडियाने भारतीय बाजारपेठेसाठी बनवलेल्या पहिल्या सब-कॉम्पॅक्ट दुसरी झलक आज दाखवली. २०२०-२१ या वर्षाच्या पूर्वार्धात ही गाडी बाजारपेठेत दाखल होणार आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या तत्त्वज्ञानावर आधारित भारतासाठी बनवलेली पहिली कॉम्पॅक्ट एसयुव्ही निसान लवकरच बाजारपेठेत दाखल करणार आहे.  ही सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतीय बाजारात Maruti Suzuki Vitara Brezza, Hyundai Venue, Tata Nexon, Ford EcoSport आणि Mahindra XUV300 यांसारख्या गाड्यांना टक्कर देईल.

आणखी वाचा – (Kia ची जबरदस्त ‘क्रेझ’, Seltos ठरली एक नंबर SUV)

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेली ही नवी कॉम्पॅक्ट एसयुव्ही शैलीदार रचनेसह विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी प्रीमिअम गाडी आहे. निसानच्या या नव्या एसयुव्हीमध्ये निसान इंटेलिजंट मोबिलिटीचा भाग म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असून वाहनाला ताकद कशी द्यायची, वाहन कशा प्रकारे चालवले गेले पाहिजे आणि समाजाचा भाग बनले पाहिजे, यासाठीच्या कंपनीच्या धोरणाला अनुसरून या वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे.

आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)

सातत्यपूर्ण कल्पक शोध आणि जपानी अभियांत्रिकी यांचा वारसा जपणाऱ्या निसानच्या जागतिक स्तरावरील एसयुव्हीच्या डीएनएशी मेळ खाणारी ही सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही असून पॅट्रोल, पाथफाइंडर, आर्माडा, एक्स-ट्रेल, ज्यूक, काशकाई आणि किक्स आदी निसानच्या प्रतिष्ठित मॉडेल्सचा वारसा पुढे नेणारी आहे.  कंपनीने अद्याप या गाडीबाबतची अजून माहिती दिलेली नाही.

आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)