निसान इंडियाने आज(दि.१) तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि शैलीदार अशा आपल्या बी-एसयूव्ही कन्सेप्टचे हेडलाइट्स आणि ग्रिल यांची झलक दाखवली.  निसान मॅग्नाइट (Nissan Magnite)  नावाने ही नवीन कार बाजारात उतरवण्याची शक्यता आहे. कंपनीच्या जागतिक मुख्यालयात १६ जुलैला बी–एसयूव्ही कन्सेप्टचे जगासमोर प्रथमच अनावरण होणार आहे.

आर्थिक वर्ष २०२०–२१च्या दुसऱ्या सहामाहीत ही कॉम्पॅक्ट बी–एसयूव्ही बाजारपेठेत दाखल करण्याचे नियोजन आहे.  मार्केटमध्ये या छोट्या एसयूव्हीची टक्कर मारुती ब्रिझा आणि ह्युंडाई व्हेन्यू या गाड्यांशी असेल. 4-मीटरपेक्षा छोटी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी ही नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही अत्यंत मजबूत, दमदार, डायनॅमिक रोड प्रेझेन्ससाठी शैलीदार डिझाइनसह विविध वैशिष्ट्यांनी युक्त तयार करण्यात आली आहे.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी

या कारच्या स्पेसिफिकेशन्सबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण, निसानच्या या नव्या एसयूव्हीमध्ये निसान इंटलिजंट मोबिलिटीचा भाग म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. काही रिपोर्ट्समध्ये या छोट्या एसयूव्हीची किंमत 5.25 लाख रुपये ते सहा लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.