27 February 2021

News Flash

‘निसान’ची नवी एसयुव्ही ‘किक्स’ लाँच, किंमत 9.55 लाख रुपये

निसान किक्स XL, XV, XV Premium आणि XV Premium+ अशा चार व्हेरिअंटमध्ये सादर

जपानची कार कंपनी ‘निसान’ने आज भारतीय बाजारात आपली नवी ‘2019 निसान किक्स कॉम्पॅक्ट SUV’ लाँच केली आहे. निसान किक्स XL, XV, XV Premium आणि XV Premium+ अशा चार व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आली आहे. 9.55 लाख ते 14.65 लाख रुपये अशी या कारच्या विविध व्हेरिअंटची किंमत ठेवण्यात आली आहे. 9.50 लाख ते 15.10 लाख रुपये किंमत असणाऱ्या ह्युंडई क्रेटाला यामुळे चांगली टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

डिसेंबर 2018 पासून 25 हजार रुपयांत या कारसाठी नोंदणी सुरू असून निसानच्या डिलर्सकडून अथवा संकेतस्थळावरुन निसान किक्सची बुकिंग करता येईल. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या मॉडलपेक्षा भारतात लाँच होणारं मॉडल थोडं मोठं असणार आहे. या कारची लांबी 4,384mm, रुंदी 1,813mm आणि उंची 1,656mm याशिवाय व्हिलबेस 2,673mm असेल. क्रिक्समध्ये रेनॉ कॅप्चर इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये 1.5 लिटरचं डिझेल इंजिन आहे. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या या इंजिनद्वारे 110hp पावर आणि 240Nm टॉर्क जनरेट होतं. तर डीझेल इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. पेट्रोल इंजिन दोन व्हेरिअंटमध्ये तर डिझेल इंजिन चार व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल.

या कारच्या पेट्रोल व्हेरिअंटवर एक लिटर पेट्रोलमध्ये 14.23 किलोमीटरचा मायलेज मिळेल. तर, डिझेल बेस व्हेरिअंटमध्ये 20.45 किलोमीटर प्रतिलीटर आणि टॉप व्हेरिअंटमध्ये 19.39 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज मिळेल असा कंपनीचा दावा आहे. कालांतराने ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचाही पर्याय उपलब्ध होईल.

या कारमध्ये आरामदायकपणे अॅड्जस्ट करता येणारं ड्रायव्हर सीट, एलईडी डीआरएल, पावर विंडो, इंटीग्रेटेड टर्न इंडिकेटर्ससह पावर अॅड्जस्टेबल विंग मिरर्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी वेंट्स आणि चार-स्पीकर्ससह ऑडिओ सिस्टीम, पुश बटन स्टार्ट असे फीचर्स आहेत. याशिवाय अनेक असे फीचर्स आहेत जे या सेगमेंटमध्ये प्रथमच देण्यात आलेत. यामध्ये 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम असून ही सिस्टीम 360-डिग्री कॅमेरा डिस्प्लेच्या रुपातही काम करते. डॅशबोर्डवर लेदर इंसर्ट्स देण्यात आले असून एलईडी हेडलॅम्प्स, क्रूज कंट्रोल, ऑटोमॅटिक वायपर्स आणि 17-इंच अॅलॉय व्हिल्स यांसारखे फीचर्स आहेत. टेलीमॅटिक्स स्मार्टवॉच, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्सचा पर्यायही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 3:38 pm

Web Title: nissan kicks suv launched in india know all features and price
Next Stories
1 मारुती सुझुकीची नवी Baleno , 11 हजार रुपयांत बुकिंग सुरू
2 48MP कॅमेरा आणि पंचहोल डिस्प्ले , Honor View 20 चं आज ग्लोबल लाँचिंग
3 एअरटेल : 1699 रुपयांत 365 वैधता आणि 365जीबी डेटा
Just Now!
X