Nissan ने भारतीय बाजारात Kicks एसयूव्ही कारची नवीन ‘स्वस्त’ आवृत्ती लाँच केली आहे. Kicks XE असं या आवृत्तीचं नाव असून 9.89 लाख रुपये इतकी एक्स शोरुम किंमत आहे. आतापर्यंत Kicks XL व्हेरिअंट असलेली कार यातील बेसिक व्हेरिअंट म्हणून ओळखली जात होती, पण आता Kicks XE ही नवी कार बेसिक व्हेरिअंट म्हणून ओळखली जाणार आहे. आधीच्या बेसिक व्हेरिअंट XL (डिझेल इंजिन) च्या किंमतीपेक्षा नवीन Kicks XE व्हेरिअंट 1.2 लाख रुपयांनी स्वस्त आहे. 9.89 लाख रुपये इतकी या Kicks XE व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत ठेवण्यात आली आहे.

याशिवाय, कंपनीने डिझेल इंजिन असलेल्या XL आणि VX व्हेरिअंटला नव्या फीचर्ससह अपडेट दिले आहेत. किक्स डिझेलच्या अपडेटेड XL आणि VX व्हेरिअंटच्या किंमतीत कंपनीने अनुक्रमे 24,000 आणि 2,000 रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय कंपनीने दोन्ही टॉप व्हेरिअंट्स (XV Pre आणि XV Pre Option) मिळून केवळ एकच XV Pre व्हेरिअंट आणलं आहे. नव्या XV Pre व्हेरिअंटमध्ये जुन्या टॉप मॉडलमधील सर्व फीचर्स देण्यात आली असून तुलनेने किंमत जवळपास एक लाख रुपयांनी कमी आहे. नव्या XE व्हेरिअंटमध्येही आधीच्या XL व्हेरिअंटमधील सर्व फीचर्स देण्यात आलेत.

या कारची लांबी 4,384mm, रुंदी 1,813mm आणि उंची 1,656mm याशिवाय व्हिलबेस 2,673mm असेल. क्रिक्समध्ये रेनॉ कॅप्चर इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये 1.5 लिटरचं डिझेल इंजिन आहे. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेल्या या इंजिनद्वारे 110hp पावर आणि 240Nm टॉर्क जनरेट होतं. तर डीझेल इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. कारच्या पेट्रोल व्हेरिअंटवर एक लिटर पेट्रोलमध्ये 14.23 किलोमीटरचा मायलेज मिळेल. तर, डिझेल बेस व्हेरिअंटमध्ये 20.45 किलोमीटर प्रतिलीटर आणि टॉप व्हेरिअंटमध्ये 19.39 किलोमीटर प्रतिलीटर मायलेज मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

या कारमध्ये आरामदायकपणे अॅड्जस्ट करता येणारं ड्रायव्हर सीट, एलईडी डीआरएल, पावर विंडो, इंटीग्रेटेड टर्न इंडिकेटर्ससह पावर अॅड्जस्टेबल विंग मिरर्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी वेंट्स आणि चार-स्पीकर्ससह ऑडिओ सिस्टीम, पुश बटन स्टार्ट असे फीचर्स आहेत. याशिवाय अनेक असे फीचर्स आहेत जे या सेगमेंटमध्ये प्रथमच देण्यात आलेत. यामध्ये 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम असून ही सिस्टीम 360-डिग्री कॅमेरा डिस्प्लेच्या रुपातही काम करते. डॅशबोर्डवर लेदर इंसर्ट्स देण्यात आले असून एलईडी हेडलॅम्प्स, क्रूज कंट्रोल, ऑटोमॅटिक वायपर्स आणि 17-इंच अॅलॉय व्हिल्स यांसारखे फीचर्स आहेत. टेलीमॅटिक्स स्मार्टवॉच, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्सचा पर्यायही आहे.

किंमत – Kicks XE – 9.89 लाख रुपये, Kicks XL – 11.09 लाख रुपये, Kicks XV – 12.51 लाख रुपये, Kicks XV Pre – 13.69 लाख रुपये