निसान इंडियाने आज(दि.16) आपल्या बहुचर्चित बी-एसयूव्हीच्या कन्सेप्ट व्हर्जनचे अनावरण केले.  निसान मॅग्नाइट (Nissan Magnite)  नावाने ही नवीन बी-एसयूव्ही बाजारात उतरवणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं. निसान मॅग्नाइट असे नामकरण केलेली ही तंत्रज्ञान समृद्ध आणि शैलीदार बी-एसयूव्ही पुढील वर्षात भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे.

“मॅग्नेटिक आणि  इग्नाइट या दोन शब्दांद्वारे मॅग्नाइट असे नामकरण करण्यात आले आहे.  निसान मॅग्नाइट ही निसानच्या जागतिक एसयूव्ही डीएनएच्या उत्क्रांतीमधील पुढील झेप आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे या श्रेणीचे चित्र पालटणारे हे वाहन असेल. चार मीटर लांबीच्या आतील वाहन श्रेणीतील अशा प्रकारच्या धाडसी वाहनामुळे निसान मॅग्नाइट ही बी-एसयूव्ही श्रेणीची व्याख्याच बदलून टाकेल, असा आम्हाला विश्वास आहे.  मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड  या तत्त्वज्ञानानुसार निसान मॅग्नाइट तयार करण्यात आली असून भारतीय ग्राहकांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन जपानमध्ये याची संरचना करण्यात आली आहे”, असे निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले.

(छोट्या फॅमिलीसाठी बेस्ट ऑप्शन आहे ‘ही’ देशातील सर्वात स्वस्त कार! किंमत फक्त….)

पुढील वर्षी मार्च महिन्यात ही कॉम्पॅक्ट बी–एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये या छोट्या एसयूव्हीची टक्कर मारुती ब्रिझा आणि ह्युंडाई व्हेन्यू या गाड्यांशी असेल. 4-मीटरपेक्षा छोटी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी ही नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही अत्यंत मजबूत, दमदार, डायनॅमिक रोड प्रेझेन्ससाठी शैलीदार डिझाइनसह विविध वैशिष्ट्यांनी युक्त तयार करण्यात आली आहे.

(टोयोटाच्या ‘इनोव्हा’ला देणार तगडी टक्कर, लाँच झाली शानदार MG Hector Plus)

(प्रतीक्षा संपली! Honda City नेक्स्ट जनरेशन झाली लाँच)

या कारच्या स्पेसिफिकेशन्सबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण, निसानच्या या नव्या एसयूव्हीमध्ये निसान इंटलिजंट मोबिलिटीचा भाग म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. काही रिपोर्ट्समध्ये या छोट्या एसयूव्हीची किंमत 5.25 लाख रुपये ते सहा लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.