‘मेक इन इंडिया, ‘ मेक फॉर द वर्ल्ड’ या तत्त्वज्ञानानुसार निसान इंडियाने बनवलेल्या सर्वस्वी नवीन निसान मॅग्नाइट या बहुप्रतीक्षित बी-एसयूव्हीचे अनावरण बुधवारी झाले. भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीने आखलेल्या निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी असून आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ती प्रत्यक्ष रस्त्यांवर धावू शकेल.

निसान इंटलिजंट मोबिलिटीचा (एनआयएम) भाग म्हणून यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजा आणि महत्त्वाकांक्षा यांचे भान ठेवून जपानमध्ये डिझाइन करण्यात आलेल्या नव्या निसान मॅग्नाइटमध्ये वर्गातील प्रथम (फर्स्ट इन क्लास) आणि श्रेणीतील सर्वोत्तम (बेस्ट इन सेगमेंट) अशा अनेक वैशिष्टय़ांचा समावेश आहे.  एकूण नऊ  रंगात हे वाहन उपलब्ध असून ग्राहकांच्या आवडीनुसार ५ मोनोटोन आणि ४ डय़ुअल टोन उपलब्ध आहेत. वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, पड्ल लँप्स आणि अँबियंट/मूड लायटिंग, प्रीमिअम स्पीकर्स (हरमन समर्थित जेबीएल) असा भरगच्च टेक पॅकही आहे.

नव्या निसान मॅग्नाइटमध्ये अराउंड वू मॉनिटर (एव्हीएम) या निसानच्या सर्वोच्च सपोर्ट तंत्रज्ञानाचा समावेश असून यामुळे वाहनचालकाला वाहनाच्या वरच्या भागातून दिसू शकणाऱ्या दृश्याचा अंदाज (बर्डस आय वू) घेता येऊ  शकतो. या श्रेणीतील अशा प्रकारची ही पहिलीच सुविधा आहे.

या गाडीत ‘एचआरएओ’ हे ताकदवान इंजिन असून त्यामुळे कमी वेगातही नेहमीच्या टॉर्कपेक्षा अधिक टॉर्क (गती) मिळते. संपूर्णपणे नवे असे एचआरएओ १.०—लीटर टबरे इंजिन हे देशातील अशा प्रकारचे पहिलेच इंजिन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

प्रशस्त जागा

पुढच्या सीट्सची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे, जेणेकरून तिथे बसणाऱ्या प्रवाशांना मागील सीट्सवर बसलेल्या प्रवाशांप्रमाणे प्रशस्त जागेचा अनुभव येईल. यालाच ‘वन क्लास अबव्ह’ नी रूम म्हणतात. नव्या निसान मॅग्नाइटच्या लगेज रूमची क्षमता (३३६ लीटर) ही या श्रेणीतील सर्वाधिक असून एकावेळी तीन सूटकेसेस राहू शकतात.