News Flash

4000 मुलांसाठी नीता अंबानी झाल्या ‘सांताक्लॉज’, JioWonderland चे केले अनावरण

मुंबईत JioWonderland चे अनावरण

4000 मुलांसाठी नीता अंबानी झाल्या ‘सांताक्लॉज’, JioWonderland चे केले अनावरण

ख्रिसमसला आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. असेच गिफ्ट 4000 मुलांना मिळाले आहे. विशेष म्हणजे हे गिफ्ट चक्क रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्याकडून मिळाले आहे. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात हा सोहळा पार पडला आणि हातात गिफ्ट पाहून तब्बल 4 हजार मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. वांद्रे-कुर्ला संकुलात ‘जिओ वंडरलँड’मध्ये भारतातील सर्वात मोठ्या ख्रिसमस ट्रीजवळ नीता अंबानी आणि ईशा अंबानी-पिरामल यांनी ख्रिसमसचा सण साजरा केला.

100 फूट उंच या ख्रिसमस ट्रीची सर्वात मोठी खासियत म्हणजे प्लास्टिक बाटल्या रिसायकल करुन या ख्रिसमस ट्रीची निर्मिती करण्यात आलीये. रिलायंसच्या सर्व कर्मचाऱ्यांना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी निरुपयोगी प्लास्टिक बाटल्या गोळा करण्यास सांगण्यात आलं होतं. त्या सर्व बाटल्यांना रिलायंस फाउंडेशनने रिसायकल केले, त्यानंतर त्यापासूनच ख्रिसमस-ट्री बनविण्यात आला.

पाहा व्हिडीओ –

मुंबईमध्ये रिलायंस फाउंडेशनकडून जिओ गार्डनमध्ये एका ‘वंडरलँड’ची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. ख्रिसमसनिमित्त सांताक्लॉजसोबत भरपूर मज्जा करता यावी यासाठी मुंबई आणि जवळपासच्या 4 हजाराहून अधिक गरीब विद्यार्थ्यांना वंडरलँडमध्ये मनोरंजनासाठी बोलावण्यात आले होते. त्यानिमित्त बोलताना, “लहान मुलं हे उद्याचे भविष्य आहे. कोणताही आनंद सर्वप्रथम लहान मुलांसोबत साजरा करावा असं मला नेहमी वाटतं. या चार हजार मुलांना जिओवंडरलँडचा अनुभव घेण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे”, असं नीता अंबानी म्हणाल्या. यावेळी नीता अंबानी आणि सांताक्लॉजने लहानग्यांना खास गिफ्टही दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2019 3:56 pm

Web Title: nita ambani unveil jiowonderland in mumbai and turns santa for 4000 underprivileged kids sas 89
Next Stories
1 मोदींच्या गॉगलची किंमत पाहून तुम्ही थक्क व्हाल
2 Video: … म्हणून त्याने स्वत:ची दोन कोटींची मर्सिडीज एक हजार फुटांवरुन खाली फेकली
3 प्रतीक्षा संपली! डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी WhatsApp मध्ये आलं खास फीचर
Just Now!
X