News Flash

जुनी गाडी असलेल्यांना भरावा लागणार Green Tax, नितीन गडकरींनी प्रस्तावाला दिली मंजुरी

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी...

जुनी गाडी वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठ वर्षे जुन्या वाहनांवर लवकरच ग्रीन टॅक्स (Green Tax) आकारला जाण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ग्रीन टॅक्स आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकार जुन्या प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर हरित कर लावण्याचा विचार करीत आहे. ग्रीन टॅक्स आकारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली असून हा प्रस्ताव आता सल्लामसलतीसाठी राज्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

वाहनयोग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना आकारणार Green Tax:-
या प्रस्तावानुसार जी वाहने आठ वर्षांपेक्षा जुनी आहेत त्यांच्याकडून वाहनयोग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना रस्ता कराच्या १० ते २५ टक्के दराने हरित कर आकारण्यात येण्याची शक्यता आहे. खासगी वाहनांकडून नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना १५ वर्षांनंतर हरित कर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक परिवहन सेवेतील (शहर बसगाडय़ा) गाडय़ांकडून सर्वात कमी हरित कर आकारण्यात येणार आहे.

कोणत्या वाहनांना मिळणार सूट ?
हायब्रिड, इलेक्ट्रिक आणि सीएनजी, इथेनॉल आणि एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांना या करातून सूट देण्यात येणार असून हरित कराद्वारे जमा होणाऱ्या महसुलाचा वापर प्रदूषणाचा प्रश्न हाताळण्यासाठी केला जाणार आहे, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले.

१५ वर्षांपेक्षा जुन्या सर्व सरकारी वाहनांची नोंदणी १ एप्रिल २०२२ पासून रद्द :
याशिवाय पर्यावरण संरक्षणासंदर्भात मंत्रालयाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत १५ वर्षांपेक्षा जुन्या सर्व सरकारी वाहनांची नोंदणी १ एप्रिल २०२२ पासून रद्द केली जाईल आणि त्यांना भंगारात काढले जाईल. याची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 8:35 am

Web Title: nitin gadkari approves proposal to levy green tax on old polluting vehicles sas 89
Next Stories
1 उद्या लाँच होणार ‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम, जाणून घ्या काय आहे खासियत
2 Whatsapp वर बदलणार चॅटिंगची मजा, येतंय नवीन Sticker Shortcut फिचर
3 Google चा मोठा निर्णय, ‘या’ अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर नाही काम करणार व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप
Just Now!
X