जगभरातील अनेकांचा सध्या शाकाहाराकडे कल वाढताना दिसत आहे. अनेकांनी शाकाहाराकडे वळण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. काहीजण प्राण्यांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तर काहीजण आरोग्यासंदर्भातील चिंता म्हणून तर काही पर्यावरण प्रेमापोटी शाकाहारी होण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र असं असतानाच एका नवीन अभ्यासामध्ये शाकाहारी लोकांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. हे संशोधन मांसाहार करणारे आणि व्हेगन म्हणजे दुग्धजन्य पदार्थही न खाणाऱ्या शाकाहारी लोकांसंदर्भात करण्यात आलं आहे. दुग्धजन्य पदार्थ आणि मांसांहार टाळणाऱ्यांच्या हाडं ही मांसांहार करणाऱ्यांपेक्षा अधिक ठिसूळ असतात अशी माहिती एका अभ्यासामधून समोर आलीय.

नक्की वाचा >> व्हेज खाणाऱ्यांपेक्षा नॉन व्हेज खाणाऱ्यांना डिप्रेशनचा धोका कमी ; संशोधकांचा दावा

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
5 Crore and 45 lakh embezzlement in Nandura Urban Bank
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…

जर्मन फेड्रल इन्स्टीट्यूट फॉर रिस्क असेसमेंट या संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये हे निष्कर्ष समोर आले आहेत. व्हेगन व्यक्ती आणि मांसाहार करणाऱ्या व्यक्तींच्या हाडांची क्षमता या अभ्यासामध्ये संशोधकांनी तपासली. या अभ्यासामध्ये ३६ व्हेगन आणि ३६ मासांहारी व्यक्तींनी सहभाग घेतला होता. या सर्व ७२ जणांच्या हडांच्या काही चाचण्या करण्यात आल्या. अल्ट्रासाऊण्ड तंत्रज्ञानाच्या मदतीने हाडांची घनता तपासून पाहण्यात आली. त्यावेळी व्हेगन व्यक्तींच्या अल्ट्रासाऊण्ड व्हॅल्यू ही मांसांहार करणाऱ्या आणि दुग्धजन्य पदार्थ खाणाऱ्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून आलं. अल्ट्रासाऊण्ड व्हॅल्यू कमी असणे हे हाडं ठिसूळ असण्याचं लक्षण आहे.

या अभ्यासामध्ये सहभागी झालेल्या ७२ जणांच्या रक्ताचे आणि लघवीचेही परिक्षण करण्यात आलं. या माध्यमातून हाडांचे आरोग्य कायम राखण्यासाठी शरीरामध्ये आवश्यक असणाऱ्या १२ घटकांचे प्रमाण किती आहे हे संशोधकांनी तपासून पाहिलं. यामध्ये संशोधकांना जीवनसत्व अ, ब ६, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सीलीनोप्रोटीन पी, ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसीड, लायसिन, लूसिन, आयोडिन, थायरॉडसंदर्भातील संप्रेरक, अल्फा क्लोथो प्रोटीन यासारखे घटक असणाऱ्यांची हाडं चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून आलं.

नक्की वाचा >> देशात गाढवं नामशेष होण्याच्या मार्गावर; आरोग्यवर्धक असल्याचं सांगत ‘या’ राज्यात होतेय गाढवाच्या मांसाची विक्री

लायसिन हे अन्नातील प्रोटीनच्या पचनानंतर निर्माण होणार्‍या बावीस अमायनो अ‍ॅसीडपैकी एक आहे. लायसिन हे मांस, मच्छी, दुग्धजन्य पदार्थ आणि अंड्यांपासून मिळणाऱ्या घटकांपैकी एक आहे. लायसिन हे सोयसारख्या वनस्पतीजन्य पदार्थांपासूनही मिळतं. विशेष म्हणजे पचनासाठी मदत करणारं हे लायसिन मानवी शरीरामध्ये तयार होत नाही. त्यामुळे लायसीन असणाऱ्या पदार्थांच्या सेवन फायद्याचे ठरते. जीवनसत्व अ हे अनेक पालेभाज्या आणि अंड्यांमध्ये आढळून येतं. मात्र जीवनसत्व ब ६ हे मांस आणि काही फळांमध्ये आढळून येतं.  याचप्रमाणे या अभ्यासामध्ये मजबूत हाडं असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरामध्ये एफजीएफथ्री या संप्रेरकाचं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलं. या संप्रेरकाच्या मदीतने फ्लाझमामधील फॉस्फेटचे प्रमाण नियंत्रणात राहते.

नक्की वाचा >> “हलाल मांस हिंदू, शीख धर्माविरोधात; रेस्तराँ मालकांनी मांस कोणतं ते स्पष्टपणे लिहावं”

जर्मन फेड्रल इन्स्टीट्यूट फॉर रिस्क असेसमेंट या संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅण्ड्रेस हॅन्सल यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये, “लोकं व्हेगन होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामागे प्राण्यांबद्दलचं प्रेम आणि पर्यावरणासंदर्भातील समस्यांबद्दलची जागृक्ता हे सुद्धा महत्वाचं कारण आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या चिंतेमुळे व्हेगन होणाऱ्यांचं प्रमाणेही अती आहे. शाकाहारी आणि व्हेगन जीवनपद्धतीचा अवलंब केल्याने अनेक आजारांपासून सुरक्षित राहता येतं असं अनेक संशोधनांमधून सिद्ध झालं आहे. यामध्ये मधुमेह, हृदयाशीसंबंधित आजार आणि कॅन्सरसारख्या आजारांचा समावेश होतो. मात्र त्याचवेळी व्हेगन जीवनशैलीमुळे हाडांमधील आवश्यक घटकांचे प्रमाण कमी होण्याची समस्याही दिसून येते. अशा व्यक्तीच्या हाडं ही मांसाहार करणाऱ्या व्यक्तींपेक्षा ठिसूळ असल्याने ती फ्रॅक्चर होण्याचा धोका अधिक असतो,” असं म्हटलं आहे.