23 September 2020

News Flash

सर्व डिझेल कारची विक्री थांबवण्याचा निर्णय, मारुती सुझुकीची मोठी घोषणा

डिझेल इंजिन बंद करण्याचा कंपनीचा निर्णय

देशातील ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रातील ख्यातनाम कंपनी मारुती सुझुकीने पुढील वर्षी म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून देशात मारुती सुझुकी कंपनीच्या डिझेल कार विकल्या जाणार नाहीत अशी घोषणा केली. कंपनीचे चेअरमन आर.सी.भार्गवा यांनी गुरूवारी(दि.25) याबाबत माहिती दिली.

देशात डिझेलच्या वाढत्या दरांचा आणि भारत स्टेज 6 (BS VI ) या अंतर्गत प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने ऑटोमोबाईल क्षेत्रावर लावलेल्या आर्थिक भाराचा जबर फटका या कंपनीला लागल्याचं समोर येत आहे. यामुळे 2020 पासून आपल्या पोर्टफोलिओ मधून सर्व डिझेल कार वगळण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे, असेही भार्गवा यांनी सांगितले. डिझेल इंजिनला BS-VI नियमांनुसार अपग्रेड करण्यासाठी अधिक खर्च होतो, त्यामुळे कार्सच्या किंमती वाढवाव्या लागतात आणि परिणामी विक्रीवर परिणाम होतो, म्हणून कंपनीने डिझेल इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पण, जर डिझेल इंजिनची मागणी ग्राहकांकडून मोठ्याप्रमाणात असेल तर पुन्हा हे डिझेल इंजिन काही बदल करुन आणलं जाऊ शकतं, म्हणजेच ग्राहकांचा प्रतिसाद पाहून डिझेल इंजिन पुन्हा आणण्याबाबत निर्णय घेतला जाईल असंही भार्गवा यांनी स्पष्ट केलं आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वीच कंपनीने BS-VI इंजिनसह बलेनो आणि अल्टो कार लाँच केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 11:14 am

Web Title: no more diesel cars from april 2020 big announcement from maruti suzuki
Next Stories
1 शाओमीचा धमाका ! इलेक्ट्रीक स्कूटर लाँच
2 KTM Duke 790 लवकरच होणार लाँच, बजाजने जारी केला टीझर
3 World Malaria Day 2019: जाणून घ्या गप्पी मासे आणि हिवतापाचा संबंध काय?
Just Now!
X