आजकाल अनेक लोकांना मूत्रपिंडाशी निघडीत आजार होत आहेत. प्रदुषण आणि खराब जिवनशैलीचा प्रवाभ लोकांच्या शरीराच्या विविध भागावर पडतो आणि त्यामुळं अनेकांना मृत्यूला सामोरंही जावं लागले आहे. बदलत्या जिवनशैली आणि वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांची मुत्रपिंड खराब झालेली आहेत. अशांना डायलिसिससाठी रूग्णालयात जावं लागतेय. मात्र केंद्र सरकारनं डायलिसिस झालेल्या रूग्णांची घरच्या घरी उपचाराची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. लोकसभा निवडणूका झाल्यानंतर राज्य सरकार याला लागू करणार आहे. ऐवढेच नाही तर सरकार रूग्णांची काळजी घेणाऱ्यांसाठी एका कार्यशाळेचं आयोजनही करणार आहे. यामध्ये मृत्रपिंडचा आजार झालेल्या रूग्णाचे डायलिसिस कसे  करावे हे सांगणार आहेत.

डायलिसिसचा उपचार करण्यासाठी रूग्णाच्या पोटात कॅथेटर ट्यूब (नलिका) बसवली जाते. त्यामार्फत पोटामध्ये पेरिटोनियम डायलिसिस फ्लूड आतमध्ये सोडलं जातं. त्याचे प्रमाण दोन लिटर असते. तीस ते चाळीस मिनिट शरिराच्या आतमध्ये राहते. पोटात असणाऱ्या नलिकेला आणिखी एक कॅथेटर नलिका जोडली जाते. त्यामार्फत रक्तातील अपशिष्ट पदार्थ बाहेर काढले जातात. ही प्रक्रिया २४ तासांतून तीन वेळा करावी लागते.  देशात वर्षाला दोन लाखांपेक्षा जास्त रूग्णाला मृत्रपिंडाचा आजार होतो. त्यासाठी जवळपास ३.४ कोटी डायलिसिसची मागणी होते. सरकारची ही योजना लागू झाल्यानंतर रूग्णाला आणि रूग्णाची काळजी घेणाऱ्याला सतत रूग्णालयात जायची गरज लागणार नाही.

कमी उत्पन्न असणाऱ्या रूग्णांना ओषधं आणि उपचाराच्या किटसाठी पैशांची गरज लागणार नाही. आरोग्य मंत्रालयानुसार, डायलिसिस करण्याआधी रूग्णाच्या पोटामध्ये एकाच नलिकेद्वारे उपचार केला जाईल. त्यानंतर पेरिटोनियल किट आणि औषधं देण्यात येतील. त्याआधारे घरच्याघरी डायलिसिसचा उपचार करता येईल. घरी उपचार करण्यासाठी रूग्णाची निवड डॉक्टर करणार आहेत.