News Flash

महिलांना प्रयोगशाळेपासून दूरच ठेवलेले बरे

महिलांनी प्रयोगशाळे बाहेरच राहिलेले बरे, किंबहुना त्यांना दूरच ठेवले पाहिजे, असे खळबळजनक मत ब्रिटनचे नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सर टीम हंट यांनी व्यक्त केले आहे.

| June 11, 2015 05:22 am

महिलांनी प्रयोगशाळे बाहेरच राहिलेले बरे, किंबहुना त्यांना दूरच ठेवले पाहिजे, असे खळबळजनक मत ब्रिटनचे नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सर टीम हंट यांनी व्यक्त केले आहे. रॉयल सोसायटीने लगेच आपण त्यांच्या मताशी सहमत नाही व विज्ञान संशोधनात महिलांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. महिला किंवा मुली प्रयोगशाळेत असल्या, की त्या पुरुषांचे लक्ष विचलित करतात, असा आक्षेपही डॉ. हंट यांनी घेतला आहे. त्यांच्या या मतावर सामाजिक माध्यमातून टीकेचा भडिमार झाला असून, इसिस आणि त्यांच्यात मग फरक काय उरला, असा सवाल काहींनी केला आहे. विज्ञान संशोधन क्षेत्रात केवळ १३ टक्के महिला या क्षेत्रात काम करीत आहेत.
सर टीम हंट हे ७२ वर्षांचे असून, त्यांना २००१ मध्ये कर्करोग पेशींच्या विभाजनाचे नियंत्रण करण्याबाबतच्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांनी कोरियातील एका परिषदेत असे सांगितले, की मुली व महिलांबाबत आपल्याला अडचणी आहेत, त्या तीन प्रकारच्या आहेत, एक तर त्या प्रयोगशाळेत असतील तेव्हा तुम्ही त्यांच्या प्रेमात पडता किंवा त्या तुमच्या प्रेमात पडतात, तुम्ही टीका केली, की त्या रडण्याचे शस्त्र उपसतात.
कोरियातील महिला वैज्ञानिकांनी आयोजित केलेल्या भोजन प्रसंगी त्यांनी सांगितले, की आपले म्हणणे विनोद म्हणून घ्या पण नंतर अचानक आपण महिलांना कमी लेखणारे आहोत. त्यावर काही महिला वैज्ञानिक घाबरल्या, काहीं मटकन खाली बसल्या, काहींनी कपाळावर हात मारून घेतला. ब्रिटनसारख्या प्रगत देशातील वैज्ञानिकाने असे वक्तव्य करण्याचे त्यांना आश्चर्य वाटले, हंट हे रॉयल सोसायटीचे फेलो असून त्यांचे सहकारी युल्टा फ्रिथ यांनी ट्विटरवर टीम हंट यांच्या वक्तव्याने व्यथित झाल्याचे म्हटले आहे.

‘मुली किंवा स्त्रियांच्या बाबतीत मला  अडचणी आहेत  एक तर त्या प्रयोगशाळेत असतात, तेव्हा  तुम्ही त्यांच्या प्रेमात पडता किंवा त्या तुमच्या प्रेमात पडतात व  तिसरे म्हणजे त्यांच्यावर टीका केली तर त्या रडायला सुरूवात करतात.’
-सर टीम हंट

संशोधक पत्नीला काय वाटले असेल.
सर टीम हँट यांच्या पत्नी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे प्रतिकारशक्ती विभागाच्या प्रमुख प्राध्यापक आहेत त्यांना सर टीम हंट जे बोलले त्या विषयी काय वाटले असावे हे अजून समजलेले नाही, असे वैज्ञानिक मेरी कॉलिन्स यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2015 5:22 am

Web Title: nobel scientist tim hunt say female scientists cause trouble for men in labs
Next Stories
1 व्हिडिओ: ‘डिझ्ने’चा जादुई वेडिंग केक
2 ‘टुथब्रश’ रोग प्रादुर्भावाचे एक कारण
3 कपाळास लावता येणारे, मूड बदलणारे यंत्र
Just Now!
X