Nokia चे स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD Global ने भारतात नवीन फीचर फोन Nokia 110 लाँच केला आहे. 1,599 रुपये इतकी किंमत असलेल्या या फोनमध्ये मेमरी कार्ड सपोर्ट, एफएम रेडिओसारखे बेसिक पण आवश्यक सर्व फीचर्स आहेत. आजपासून(दि. १८) या फोनची विक्री सुरू झाली असून नोकियाच्या अधिकृत संकेतस्थळासह ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधूनही फोन खरेदी करता येईल.

Nokia 110 या फोनमध्ये कंपनीने 1.77 इंचाचा QQVGA कलर डिस्प्ले दिला आहे. 4MB रॅम आणि 4MB इंटरनल स्टोरेजसह लाँच केलेल्या या फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड (32जीबी) स्लॉट आहे. फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी qVGA कॅमेरा दिला आहे. हा फोन नोकिया सीरिज 30+ ओएसवर कार्यरत असेल. फोनमध्ये एलईडी टॉर्चलाइट, माइक्रो युएसबी पोर्ट, 3.5 एमएम ऑडिओ जॅक यांसारखे अनेक आवश्यक फीचर्स आहेत.

या फोनचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात असलेली 800mAh क्षमतेची दमदार बॅकअप देणारी बॅटरी. ही बॅटरी 14 तासांपर्यंत टॉक टाइम, 18.5 दिवसांपर्यंत स्टँड बाय, 27 तासांपर्यंत म्युझिक प्ले आणि 7.5 तासांपर्यंत व्हिडिओ प्ले इतका बॅकअप देते असा कंपनीने दावा केला आहे.