काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या नोकिया 2.2 या बजेट स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू होत आहे. फ्लिपकार्ट आणि नोकियाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याशिवाय या फोनची ऑफलाइन विक्री देखील होणार आहे. फोनच्या खरेदीवर ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफरही ठेवण्यात आल्या आहेत. यात नो-कॉस्ट इएमआय आणि डिस्काउंटचा समावेश आहे.

30 जूनपर्यंत हा फोन खरेदी केल्यास याच्या 2 जीबी रॅम व 16 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 6 हजार 999 रुपये इतकी असेल.  तर, 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 7 हजार 999 रुपये असेल. 30 जूननंतर या फोनची किंमत अनुक्रमे  7 हजार 699 रुपये आणि 8 हजार 699 रुपये असेल. एसबीआय क्रेडिट कार्डने ईएमआयवर या फोनची खरेदी केल्यास 5 टक्के इन्स्ंटट कॅशबॅक मिळणार आहे. त्याशिवाय अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डवरदेखील 5 टक्के इन्स्ंटट

5.71 इंचाचा एचडी डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये कंपनीने एक डेडीकेटेड गुगल असिस्टंट बटण दिलं आहे.  हे बटण गुगल असिस्टंट walkie talkie फीचरला सपोर्ट करतं. बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, तर सेल्फी प्रेमींसाठी पुढील बाजूला 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक ए22 सीपीयू चिपसेट देण्यात आला आहे. नोकिया 2.2 मध्ये अॅण्ड्रॉईड 9 पाय ओएसवर कार्यरत आहे.  फेस अनलॉक फीचर असणाऱ्या या फोनची बॅटरी क्षमता 3000 एमएएच इतकी आहे.