जर तुम्ही नोकियाचा स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.3 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण, कंपनीकडून या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.  या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा, मोठा डिस्प्ले असून दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

नोकिया 2.3 फीचर्स –
‘अँड्रॉइड 9.0’ वर कार्यरत असणाऱ्या नोकिया 2.3 ला ‘अँड्रॉइड 10’ अपडेट लवकरच मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि क्वॉड-कोर मीडियाटेक हीलियो A22 SoC प्रोसेसर असून ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सल क्षमतेचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. नोकिया 2.3 मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. याशिवाय 4,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. चारकोल, सियान ग्रीन आणि सँड अशा तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.  

आणखी वाचा – (10 हजारांहून कमी किंमतीचे ‘बेस्ट स्मार्टफोन्स’)

नोकिया 2.3 किंमत –
कंपनीकडून या फोनच्या किंमतीत एक हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे, 2GB रॅम आणि 32 GB स्टोरेज असलेला हा फोन तुम्हाला आता अवघ्या 7,199 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. कंपनीच्या संकेतस्थळावर हा फोन नव्या किंमतीसह उपलब्ध आहे.