26 February 2021

News Flash

Nokia 3.4 : लेटेस्ट ‘बजेट’ फोनची आजपासून विक्री सुरू, किंमत 11 हजार 999 रुपये

ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह फिंगरप्रिंट सेन्सरसारखे दमदार फिचर्स

नोकियाचे स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD ग्लोबलने फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला (दि.१०) भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन Nokia 5.4 आणि Nokia 3.4 लाँच केले. Nokia 5.4 आणि Nokia 3.4 दोन्ही बजेट स्मार्टफोन आहेत. यातील Nokia 5.4 फोनची विक्री यापूर्वीच सुरू झाली आहे. तर आजपासून  Nokia 3.4 या फोनच्या विक्रीला सुरूवात होत आहे. फ्लिपकार्टच्या वेबसाटवर दुपारी 12 वाजेपासून फोनच्या सेलला सुरूवात होईल. याशिवाय नोकियाची अधिकृत वेबसाइट आणि अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुनही फोन खरेदी करता येईल. Nokia 3.4 मध्ये तीन रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आणि पंचहोल डिस्प्लेही आहे.

Nokia 3.4 स्पेसिफिकेशन्स :-
Nokia 3.4 फोनमध्ये 6.39 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जी स्टोरेज मिळेल. मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये तीन रिअर कॅमेरे असून मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा, दुसरा 5 मेगापिक्सेल आणि तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. तर, सेल्फीसाठी पुढे 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, ब्लूटूथ 4.2, GPS/A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर हे फिचरही आहे. Nokia 3.4 मध्येही कंपनीने 4000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.

Nokia 3.4 ची भारतात किंमत :
Nokia 3.4 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. हा फोन चारकोल, डस्क आणि Fjord अशा तीन कलरच्या पर्यायांत उपलब्ध असेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 11:41 am

Web Title: nokia 3 4 goes on sale in india today check price in india and specifications sas 89
Next Stories
1 Moto E7 Power : मोटोरोलाचा स्वस्त फोन भारतात झाला लाँच, किंमत १० हजारांपेक्षाही कमी
2 स्वस्त स्मार्टफोन Poco M3 खरेदी करण्याची पुन्हा संधी ; किंमत 10,999 रुपये
3 भारतात Apple iPhone मॅन्युफॅक्चर करणाऱ्या Wistron ने दिली ‘गुड न्यूज’, हिंसाचारापासून बंद आहे प्लांट
Just Now!
X