11 December 2017

News Flash

‘Nokia 3310’ होणार रिलाँच?

मी परत येतोय!

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 21, 2017 5:33 PM

या हँडसेटची किंमत ४ हजारांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.

स्मार्टफोनच्या युगात नोकिया फोन कधी बाहेर फेकले गेले कळलंच नाही. भारतीय बाजारपेठेत नोकियाचे नाव मोठे होते. आजही सगळ्यात भरवश्याचा हँडसेट म्हणून नोकियाचे उदाहरण दिले जाते. रफ अँड टफ युज आणि दिर्घकाळ बॅटरी लाईफ असणारे फोन म्हणून या फोनचे उदाहरण दिले जायचे. आजही अनेकांकडे नोकियाचे जुने हँडसेट असतील. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माहितीनुसार नोकिया आपला ३३१० हा हँडसेट रिलाँच करणार आहे.

VIDEO: नोकिया पी १ स्मार्टफोनचे फीचर्स लीक, जाणून घ्या काय आहे नवीन?

गॅझेट्स संदर्भातील अपडेट्स देणा-या पत्रकार इवान ब्लास यांनी नोकिया ३३१० च्या रिलाँचींगची बातमी दिली आहे. या महिन्यात या कंपनीकडून या संदर्भातली अधिकृत घोषणा होईल असेही सांगितले. नोकिया ३३१० मध्ये कॅमेरा नसला की तरी दिर्घ बॅटरी लाईफ आणि टिकाऊपणा हे त्याचे वैशिष्ट होतं. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हे फोन बाजारात आणणार असल्याची चर्चा आहे. स्मार्ट फोनची बॅटरी लाईफ ही कमी असते त्यामुळे पर्याय म्हणून अशा मोबाईल धारकांना हे ३३१० हँडसेट वापरता येणार आहे. या हँडसेटची किंमत ४ हजारांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.

वाचा : फोल्डिंग मोबाइल फोनच्या पुनरागमनाची शक्यता, वर्ल्ड मोबाइल काँफरंसमध्ये दिले दर्शन

तर दुसरीकडे येत्या २७ तारखेला नोकिया आपला स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे. बार्सिलोना येथे होणाऱ्या वर्ल्ड मोबाइल काँग्रेसमध्ये नोकिया स्मार्टफोन लाँच करणार आहे. नोकियाचा पी १ हा स्मार्टफोन असणार आहे. पण काही दिवसांपूर्वीचे या फोनचे फिचर्स लीक झाले असल्याचे वृत्त आले होते. स्मार्टफोनच्या बाजारात नोकिया पुन्हा एकदा आपले वर्चस्व घडवण्यासाठी धडपड करत आहे. काही दिवसांपूर्वी नोकियाने चीनमध्ये नोकिया ६ लाँच केला होते. बाजारात उपलब्ध झाल्यापासून या फोनची तुफान विक्री झाली. विक्री सुरू होण्याच्या आधीच दहा लाख लोकांनी या फोनची नोंदणी केली होती.

First Published on February 15, 2017 1:13 pm

Web Title: nokia 3310 is coming back in mobile market