04 March 2021

News Flash

‘या’ देशांत नोकिया ३३१० बिनकामाचा

नोकिया ३३१० ला रिलायन्स जिओचे 'नो नेटवर्क'

२.४ इंचाचा डिस्प्ले, ड्युएल सिम आणि २ मेगापिक्सेल कॅमेरा असे या फोनचे वैशिष्टये

बहुप्रतीक्षित अशा नोकियाच्या ३३१० या फोनेचे बार्सेलोना येथे झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये रिलाँचिंग करण्यात आले. हा फोन रिलाँच करण्यात येणार असल्याच्या बातमीने सगळीच धुमाकुळ घातला होता. त्यामुळे अनेकांना या फोनबद्दल खुपच उत्सुकता होती. दहा वर्षांपूर्वी नोकियाने आपले ३३१० हे मॉडेल लाँच केले होते. मोबाईल मार्केटवर अधिराज्य गाजवलेल्या या कंपनीचा हा फोन तेव्हा जवळपास अनेकांकडे होते. हळूहळू स्मार्ट फोन आले पण या फोनशी असणारी इमोनशन अटॅचमेंट काही दूर झाली नाही. पुढच्या महिन्यापासून हा फोन बाजारात विक्रीसाठी येणार असला तरी अनेक देशांमध्ये मात्र या फोनचा लोकांना काहीच उपयोग होणार नाही.

वाचा : नोकियाच्या नव्या स्मार्टफोनचे भारतात जूनमध्ये होणार आगमन

अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, स्विर्त्झलँड यासारख्या देशात हा फोन वापरताना खूप अडचणी येऊ शकतात. या फोनच्या नेटवर्कसाठी जी फ्रिक्वेन्सी वापरली जाते ती या देशांत नाही, तंत्रज्ञानाच्या बाबतीत हे देश पुढे आहेत त्यामुळे टुजी सोडाच येथे थ्रीजी, फोरजी नेटवर्क वापरले जाते. या देशांत जुन्या फ्रिक्वेन्सी अॅक्टीव्ह नाहीत. त्यामुळे या फोनचा तिथे उपयोग शून्य आहेत. त्यामुळे अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, स्विर्त्झलँड देशांतील ग्राहकांच्या पदरी  निराशाच पडणार आहे. पण भारतीयांना मात्र काळजी करण्याचे बिलकुल कारण नाही.  जून महिन्याच्या आसपास हे फोन भारतात उपलब्ध होणार आहेत. पण सुत्रांच्या माहितीनुसार हा फोन रिलायन्स जिओच्या नेटवर्कला कनेक्ट होणार नाही.

मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये रविवारी नोकियाने आपल्या या जुन्या फोनचे रिलाँचिंग केलं होतं. २.४ इंचाचा डिस्प्ले, ड्युएल सिम आणि २ मेगापिक्सेल कॅमेरा असे या फोनचे वैशिष्टये असणार आहे. त्याच बरोबर मायक्रो एसडी स्लॉटही असणार आहे. या फोनचा युएसपी होता ती दीर्घ बॅटरी लाईफ आणि अपेक्षेप्रमाणे २२ तासांपर्यंतचा टॉक टाईम आणि १ महिन्यापर्यंत सँडबाय बॅटरी लाईफचा दावा नोकियाने केला आहे. विषेश म्हणजे या फोनमधला सगळ्यांचा आवडता स्नेक गेम अपडेटेड व्हर्जेनमध्ये या फोनमध्ये उपलब्ध आहे. भारतात या फोननची किंमत ३७०० च्या आसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 4:53 pm

Web Title: nokia 3310 is useless in the us canada australia
Next Stories
1 नोकियाच्या नव्या स्मार्टफोनचे भारतात जूनमध्ये होणार आगमन
2 २०१८ मध्ये चंद्रावर पाठवणार पर्यटक
3 Healthy Living : ‘ही’ आहेत स्मृतिभ्रंशाची कारणे
Just Now!
X