नोकियाचे मोबाइल फोन बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबल या कंपनीने आपला Nokia 5.1 Plus हा स्मार्टफोन दोन नवे व्हेरिअंट म्हणजेच 4GB आणि 6GB रॅम व 64GB स्टोरेजसह भारतात लाँच केले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून या फोनची विक्री सुरू झालीये. लाँचिंगवेळी हा फोन अँन्ड्रॉइड 8.1 ओरियोवर कार्यरत होता, पण आता हा स्मार्टफोन अँन्ड्रॉइड 9.0 पायवर कार्यरत असेल.

7 फेब्रुवारीपासून अर्थात उद्यापासून नव्या व्हेरिअंट्सच्या विक्रीला सुरूवात होईल. हा स्मार्टफोन Nokia.com/phones या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असेल, त्यानंतर 12 फेब्रुवारीपासून हा फोन ग्लॉस ब्लॅक, ग्लॉस व्हाइट आणि ग्लॉस मिडनाइट ब्ल्यू या तीन रंगांमध्ये ऑफलाइन प्रकारात अर्थात मोबाइल दुकानांमध्ये उपलब्ध होणार आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच झाल्यापासून हा स्मार्टफोन केवळ ऑनलाइन खरेदी करता येत होता. या स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची किंमत 16,499 रुपये, तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 14,499 रुपये ठेवण्यात आली आहे. एअरटेल ग्राहकांना 2 हजार रुपयांची इंस्टंट कॅशबॅक ऑफर आणि 199 रुपये, 249 रुपये आणि 448 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक वर्षापर्यंत 240 जीबी डाटा मिळेल.

या फोनमध्ये ड्युअल सिमकार्ड आणि 5.86 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, 2.5 डी कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन, पी 60 प्रोसेसर, 3 जीबी रॅमसह 32 जीबीची स्टोरेज, ड्युअल रिअर कॅमेरा असून पहिला 13 मेगापिक्सलचा तर 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. 3060 एमएएच क्षमतेची बॅटरी असून यूएसबी टाइपसी, 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे. फिंगरप्रिंट सेन्सरही या मोबाइलमध्ये आहे.