News Flash

Nokia 5.4, Nokia 3.4 : नोकियाचे दोन ‘बजेट’ स्मार्टफोन भारतात झाले लाँच, जाणून घ्या डिटेल्स

दोन्ही फोनमध्ये मिळेल 'पंचहोल डिस्प्ले'...

नोकियाचे स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD ग्लोबलने आज (दि.१०) भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन Nokia 5.4 आणि Nokia 3.4 लाँच केले. Nokia 5.4 आणि Nokia 3.4 दोन्ही बजेट स्मार्टफोन आहेत. यातील Nokia 5.4 मध्ये क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. तर, Nokia 3.4 मध्ये तीन रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप मिळेल. दोन्ही फोनमध्ये पंचहोल डिस्प्लेही आहे. याशिवाय कंपनीने Nokia Power Earbuds Lite देखील 3,599 रुपयांत लाँच केले आहेत.

Nokia 5.4 आणि Nokia 3.4 ची भारतात किंमत :
Nokia 5.4 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची किंमत 13हजार 999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 499 रुपये आहे. हा फोन डस्क आणि पोलर नाइट कलरमध्ये उपलब्ध असेल. 17 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट आणि नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवर फोनच्या विक्रीला सुरूवात होईल. तर, Nokia 3.4 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. हा फोन चारकोल, डस्क आणि Fjord अशा तीन कलरच्या पर्यायांत उपलब्ध असेल. या फोनची विक्री 20 फेब्रुवारीपासून नोकियाच्या वेबसाइट, अ‍ॅमेझॉनच्या  आणि आणि अ‍ॅमेझॉनच्य सुरू होईल.

Nokia 5.4 स्पेसिफेकशन्स :
फोनमध्ये ड्युअल सिमकार्डचा पर्याय असून अँड्रॉइड 10 चा सपोर्टही मिळेल. या फोनसाठी अँड्रॉइड 11 चाही सपोर्ट मिळेल. फोनमध्ये 6.39 इंचाचा HD+ डिस्प्ले असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, 6 जीबीपर्यंत रॅम आणि 64 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे.

आणखी वाचा- Oppo Days Sale झाला सुरू, 8GB रॅमसह सहा कॅमेरे असलेला स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी

Nokia 5.4 कॅमेरा :
Nokia 5.4 मध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. यात 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, अन्य लेन्स अनुक्रमे 5,2 आणि 2 मेगापिक्सेलचे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. फ्रंट कॅमेरा पंचहोल स्टाइलमध्ये आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, ब्लूटूथ 4.2, GPS/A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर हे फिचरही मिळेल. तसेच फोनमध्ये 10W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4000mAh ची बॅटरीही मिळेल.

Nokia 3.4 स्पेसिफिकेशन्स :
Nokia 3.4 फोनमध्ये 6.39 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जी स्टोरेज आहे. मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये तीन रिअर कॅमेरे असून मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा, दुसरा 5 मेगापिक्सेल आणि तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. तर, सेल्फीसाठी पुढे 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Wi-Fi, ब्लूटूथ 4.2, GPS/A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर हे पिचरही आहे. Nokia 3.4 मध्येही कंपनीने 4000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 4:01 pm

Web Title: nokia 5 4 and nokia 3 4 with 4000mah batteries launched in india check price and specifications sas 89
Next Stories
1 Oppo Days Sale झाला सुरू, 8GB रॅमसह सहा कॅमेरे असलेला स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी
2 Clubhouse प्रमाणेच ट्विटरचं भारतात नवं फिचर Spaces ; जाणून घ्या खासियत
3 ट्विटरला ‘मेड इन इंडिया’ Koo ची टक्कर, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीही बनवलं अकाउंट
Just Now!
X