एकेकाळी मोबाईल विश्वात अधिराज्य गाजवणाऱ्या नोकियानं २०१७ मध्ये कमबॅक केलं. वर्षभरात नोकियानं वेगवेगळे फोन लाँच केले आणि या फोनला जगभरातून ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकताच एचएमडी ग्लोबल या कंपनीनं ‘नोकिया ६’ या फोनचं ४GB रॅम व्हेरिएंट लाँच केलं आहे. हा स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. गेल्यावर्षी नोकियानं ‘नोकिया ६’ लाँच केला होता त्यावेळी हा फोन अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होता. पण, नोकियाच्या नव्या ४ जीबी व्हेरिएंटची विक्री मात्र फ्लिपकार्टवर होणार आहे.

जुन्या ‘नोकिया ६’ पेक्षा याची किंमत अधिक असणार आहे. २० फेब्रुवारीपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतीय बाजारपेठेत याची किंमत १६ हजार ९९९ रुपये असेल. गेल्यावर्षी नोकियानं ३GB रॅम असलेला व्हेरिएंट लाँच केला होता. याची किंमत १४ हजार ९९९ रुपये होती. ज्यांच्याकडे नोकियाचं जुनं व्हेरिएंट आहे त्यांच्यासाठी कॅशबॅक ऑफरही नोकियानं देऊ केली आहे.

नोकिया ६ चे फीचर्स
५.५ इंचाचा एचडी डिस्प्ले
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर
४ जीबी रॅम
६४ जीबी स्टोअरेज
१६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा