नोकियाचे स्मार्टफोन बनविणाऱ्या एचएमडी ग्लोबलने Nokia 7.2 हा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Nokia 7.1 ची पुढील आवृत्ती आहे. 11 सप्टेंबर रोजीच हा स्मार्टफोन लाँच केला जाणार होता, मात्र त्यावेळचा इव्हेंट कंपनीने रद्द केला. अखेर आज हा स्मार्टफोन लाँच झाला आहे. 48 मेगापिक्सल क्षमतेचा मुख्य कॅमेरा असलेला हा नोकियाचा पहिलाच फोन आहे. या फोनद्वारे शाओमी, रिअलमी आणि सॅमसंग यांसारख्या कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न आहे.

4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. 23 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट, नोकियाचं अधिकृत संकेतस्थळ आणि रिटेल आउटलेट्सद्वारे या फोनच्या विक्रीला सुरूवात होईल. या फोनच्या खरेदीवर तीन महिन्यांसाठी ‘गुगल वन’ची मेंबरशिप मिळेल, यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही असं एचएमडी ग्लोबलने स्पष्ट केलं आहे. Nokia.com द्वारे हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना 2 हजार रुपयांचं गिफ्ट कार्ड मिळेल. तर Flipkart द्वारे खरेदी केल्यास एक्सचेंज ऑफरनुसार अतिरिक्त 2 हजार रुपयांची सवलत मिळेल. 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत ही ऑफर वैध आहे. फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना HDFC Bank Debit Cards द्वारे पेमेंट केल्यास 5% कॅशबॅकची ऑफर आहे. ही ऑफर 28 सप्टेंबरपर्यंत वैध असेल. याशिवाय, 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरच्या दरम्यान असलेल्या Big Billion Days sale मध्ये ICICI Bank credit cards किंवा Axis Bank card द्वारे पेमेंट केल्यास 10% सवलत मिळेल. तर, रिटेल स्टोरमधून Nokia 7.2 खरेदी करताना एचडीएफसीच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा वापर केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळेल.

आणखी वाचा :Vivo V17 Pro लाँच , दोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यांसह जगातला पहिला फोन

फीचर्स –
Nokia 7.2 मध्ये 6.3-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून यात PureDisplay डिप्स्ले तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पुढील आणि मागील बाजूला ‘कॉर्निंग गोरिला ग्लास 3’ चं कवच आहे. Qualcomm Snapdragon 660 SoC वर आधारित या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर अन्य दोन 5 आणि 8 मेगापिक्सलचे वाइड अँगल कॅमेरा सेंसर आहेत. सेल्फीसाठी यामध्ये 20-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. याशिवाय, 3,500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा ड्युअल सीम नोकिया 7.2 अँड्रॉइड 9 पायवर कार्यरत असून लवकरच याला अँड्रॉइड 10 चं अपडेट मिळणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये वाय-फाय 802.11एसी, ब्ल्युटूथ 5.0, जीपीएस आणि 4जी एलटीईचा समावेश आहे. 180 ग्रॅम इतकं या फोनचं वजन आहे.

किंमत –
4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 18 हजार 599 रुपये आहे. तर, 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 19,599 रुपये आहे.