21 October 2020

News Flash

11 हजार रुपयांनी स्वस्त झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन!

20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि मागील बाजूला 12-13 मेगापिक्सल क्षमतेचा एलईडी फ्लॅशसह ड्यूअल कॅमेरा सेटअप

Nokia 8.1 या स्मार्टफोनच्या भारतातील किंमतीत भरघोस कपात करण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या 4GB असलेल्या व्हेरिअंटच्या किंमतीत एकूण 11 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. यापूर्वी जून महिन्यात या फोनच्या किंमतीत सात हजार रुपयांची कपात करण्यात आली होती, आणि आता पुन्हा एकदा किंमत कमी झाल्याने एकूण 11 हजार रुपयांनी हा फोन स्वस्त झाला आहे. नव्या किंमतीमध्ये नोकियाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.

Nokia 8.1 चा (4GB + 64GB) बेसिक व्हेरिअंट स्मार्टफोन भारतात 26 हजार 999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, मात्र, आाता हा स्मार्टफोन नोकियाच्या ऑनलाइन स्टोअरमधून 15 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर,  6GB + 128GB व्हेरिअंट स्मार्टफोन 22  हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.  यामध्ये 6.18 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आलाय, आणि स्नॅपड्रॅगन 710 हा वेगवान प्रोसेसरही आहे. याच्या मागील बाजूला 12 आणि 13 मेगापिक्सल क्षमतेचा एलईडी फ्लॅशसह ड्यूअल कॅमेरा सेटअप आहे. शिवाय, सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. अॅन्ड्रॉइड ओरियो 8.1 वर कार्यरत असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 3,400 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आलीये. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हिटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VolTe, ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो युएसबीचा पर्याय आहे. या स्मार्टफोनची युरोपमध्ये किंमत 399 युरो म्हणजे जवळपास 32 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुबईत याची किंमत 1,499 दिरहम म्हणजे जवळपास 29 हजार रुपये ठेवण्यात आलीये. भारतात या स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांच्या आसपास ठेवली जाण्याची शक्यता आहे.

फीचर्स –
-ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर

-ड्युअल रिअर कॅमरा सेटअप कार्ल जाइस ऑप्टिक्स सह

-एफ/१.८ सह १२ मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमरा

-ऑप्टिकल इमेट स्टेबलायझेशन,

-इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलायझेशन आणि ड्युअल एलईडी फ्लॅश

-13 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, फिक्स्ड फोकस लेन्स

-3,500 एमएएच ची बॅटरी, फास्ट चार्जिंग

-ड्युअल सिम

-अँड्रॉईड 9.0 पाई तंत्रज्ञानावर आधारित

-6.18 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले

-अॅस्पेक्ट रेशो 18.7:9

-स्क्रीन टु बॉडी रेशियो 86.6 टक्के

-समोरील वरच्या बाजूस डिस्प्ले नॉच

-मेटल फ्रेम

-कनेक्टिविटी: वाय-फाय, ब्लूटूथ, 4जी VoLTE सपोर्ट, एफएम रेडियो 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 9:27 am

Web Title: nokia 8 1 price slashed in india know new price and all features sas 89
Next Stories
1 किंमत पाच लाखांहून कमी, कशी आहे ‘ही’ सात आसनी ‘कॉम्पॅक्ट एमपीव्ही’?
2 96 रुपयांत दररोज 10जीबी 4जी डेटा, BSNLचा शानदार प्लान
3 आता येणार पर्यावरणपूरक सनग्लासेस, कॉफीपासून होणार निर्मिती
Just Now!
X