Nokia 8.1 या स्मार्टफोनच्या भारतातील किंमतीत सात हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. 4GB आणि 6GB रॅम अशा दोन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत ही कपात करण्यात आली आहे. नव्या किंमतीमध्ये नोकियाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.

Nokia 8.1 चा (4GB + 64GB) बेसिक व्हेरिअंट स्मार्टफोन भारतात 26 हजार 999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, मात्र आाता हा स्मार्टफोन नोकियाच्या ऑनलाइन स्टोअरमधून 19 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर,  6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 29 हजार 999 रुपये होती. आता हा स्मार्टफोन 22  हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर 4GB  व्हेरिअंट स्मार्टफोन केवळ 19 हजार 250 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.  स्मार्टफोनच्या खरेदीवर नोकिया 4000 रुपयांपर्यंतचं गिफ्ट कार्ड आणि वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट देत आहे.  या ऑफरसाठी ‘MATCHDAYS’ या प्रोमो कोडचा वापर करावा लागेल. याशिवाय  9 महिन्यांसाठी नो कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील आहे. तसंच एअरटेलच्या ग्राहकांना 199 किंवा त्याहून अधिक रिचार्ज प्लॅनवर 1TB पर्यंत अतिरिक्त 4G डेटा मिळत आहे. तर, पोस्टपेडच्या ग्राहकांंना 120GB पर्यंत अतिरिक्त 4G डेटा, तीन महिन्यांपर्यंत  नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन आणि एक वर्षापर्यंत अॅमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन मोफत दिलं जात आहे. यासाठी ग्राहकाकडे किमान 499 रुपयांचा प्लॅन असणं गरजेचं आहे.  स्टील/कॉपर, आर्यन/स्टील आणि ब्लू/सिल्वर ड्युअल या रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

फीचर्स –
-ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर

-ड्युअल रिअर कॅमरा सेटअप कार्ल जाइस ऑप्टिक्स सह

-एफ/१.८ सह १२ मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमरा

-ऑप्टिकल इमेट स्टेबलायझेशन,

-इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलायझेशन आणि ड्युअल एलईडी फ्लॅश

-13 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, फिक्स्ड फोकस लेन्स

-3,500 एमएएच ची बॅटरी, फास्ट चार्जिंग

-ड्युअल सिम

-अँड्रॉईड 9.0 पाई तंत्रज्ञानावर आधारित

-6.18 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले

-अॅस्पेक्ट रेशो 18.7:9

-स्क्रीन टु बॉडी रेशियो 86.6 टक्के

-समोरील वरच्या बाजूस डिस्प्ले नॉच

-मेटल फ्रेम

-कनेक्टिविटी: वाय-फाय, ब्लूटूथ, 4जी VoLTE सपोर्ट, एफएम रेडियो 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट