22 November 2017

News Flash

लवकरच लाँच होणार ‘नोकिया ८’

जाणून घ्या किंमत

मुंबई | Updated: July 17, 2017 5:33 PM

जुलै महिन्याच्या अखेरीस हा फोन लाँच होणार

एकेकाळी मोबाईल बाजारपेठेत अधिराज्य गाजवणाऱ्या नोकियाने एप्रिल महिन्यात मोबाईल जगतात पुनरागमन केलं. नोकियाने आपल्या ‘३३१०’, ‘नोकिया ३’, ‘नोकिया ५’ आणि ‘नोकिया ६’ हे चार नवे हँडसेट जगभरातील बाजारपेठेत लाँच केले. आता नोकिया आपला ‘नोकिया- ८ ‘ हा फोन लाँच करणार आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस हा फोन लाँच होणार असून त्याची किंमत ४४ हजारांच्या आसपास असल्याची चर्चा आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज क्षमता असलेला हा मोबाइल आहे. सिंगल आणि डयूएल सिम अशा दोन प्रकारात हा उपलब्ध असेल. या फोनचा डिस्प्ले ५.७ इंचाचा असणार आहे त्याचप्रमाणे १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश असणार आहे.

वाचा : औषध एक्सपायर होणं म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

या आधी लाँच करण्यात आलेल्या नोकियाच्या चारही हँडसेटला बाजारपेठेत तुफान प्रसिद्ध लाभली. त्यातून काही फोन बाजारात येण्याआधीच त्याचं प्रीबुकिंग फुल्ल झालं होतं. या वर्षाअखेरीस नोकियाचे नोकिया २, नोकिया ७ आणि नोकिया ९ हे हँडसेट देखील लाँच होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात बार्सिलोना इथे झालेल्या मोबाईल वर्ल्ड क्राँगेसमध्ये नोकियाने आपल्या पुनरागमनाची घोषणा केली होती.
भारतीय बाजापेठेत ‘नोकिया ३’ आणि ‘५’, ‘६’ हे फोन टप्प्याटप्प्याने लाँच करण्यात आले होते. ‘नोकिया ३’ ची किंमत ९,४९९ रुपये, ‘नोकिया ५’ १२, ८९९ रुपयांना आणि ‘नोकिया ६’ ची १४,९९९ रुपयांना भारतात उपलब्ध आहे.

वाचा : शिओमीचा ६ जीबी रॅमचा Mi 6 प्लस आला रे…

First Published on July 17, 2017 5:33 pm

Web Title: nokia 8 may launch in july end processors leaked online