एचएमडी ग्लोबल या नोकिया फोन तयार करणाऱ्या कंपनीनं नोकियाचे तीन स्मार्ट फोन भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहेत. हे फोन या महिन्याअखेरपर्यंत विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होणार आहेत. फेब्रुवारी माहिन्यात झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये यापूर्वीच एचएमडी ग्लोबलनं नोकिया ७, नोकिया ६ आणि नोकिया ८ या फोनचं अनावरण केलं होतं.

नोकिया ७ फीचर्स
– ६ इंचाचा एचडी डिस्प्ले
– स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर
– ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोअरेज
– १२ आणि १३ मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा
नोकिया ७ हा फोन OnePlus 5T ला टक्कर देऊ शकतो. २० एप्रिलपासून या फोनचं प्रीबुकिंग सुरू होणार आहे. तर ३० एप्रिलपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
किंमत : २५, ९९९ रुपये

या व्यतिरिक्त नोकियानं Nokia 8 Sirocco हा फोन देखील लाँच केला आहे. या तीन फोनपैकी नोकियाचा हा फोन सर्वात महाग आहे. या फोनसाठी भारतीय ग्राहकांना ४९, ९९९ रुपये मोजावे लागणार आहेत. ५.५ इंचाचा कर्व्ह डिस्प्ले या फोनमध्ये असणार आहे. शिवाय वायरलेस चार्जिंग, ६ जीबी रॅम १२८ डिस्प्ले या फोनमध्ये असणार आहे. २० एप्रिलपासून या फोनचं प्रीबुकिंग सुरू होणार आहे. तर ३० एप्रिलपासून हा फोन ऑनलाइन आणि ऑफलाइनदेखील विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.