News Flash

Nokia चे नवीन वायरलेस ईअरबड्स लाँच, 36 तासांच्या बॅटरी लाइफचा कंपनीचा दावा

Nokia चे नवीन 'ट्रू वायरलेस स्टीरिओ' ईअरबड्स...

नोकियाचे स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD Global कंपनीने काही दिवसांपूर्वीत ग्लोबल मार्केटमध्ये नोकियाचे 6 स्मार्टफोन्स लाँच केले. यात Nokia G10, Nokia G20, Nokia X10, Nokia X20, Nokia C10 आणि Nokia C20 यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनीच्या ऑडिओ सेगमेंटच्या पोर्टफोलिओमध्ये एका नवीन डिव्हाइसचीही भर पडली. कारण कंपनीने Nokia Lite Earbuds लाँच केले. Nokia Lite Earbuds चं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याची बॅटरी आहे. चार्जिंग केससोबत ही बॅटरी ३६ तासांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. डिझाइनच्या बाबतीत हे इअरबड्स थोडेफार OnePlus Buds Z सारखे दिसतात.
Nokia Lite Earbuds स्पेसिफिकेशन्स :-  
Nokia Lite Earbuds ट्रू वायरलेस स्टीरिओ (TWS) ईअरबड्स आहेत.  दोन रंगांच्या पर्यायात कंपनीने हे इअरबड्स आणले आहेत. या ईअरबड्समध्ये 6mm ड्रायव्हर्स असून ट्रांसमिशन डिस्टन्स 10 मीटरपर्यंत आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या डिव्हाइसपासून १० मीटर दूर असलात तरी कोणत्याही अडथळ्याशिवाय फोनवर बोलता किंवा गाणे एकता येतील. USB Type-C चार्जिंगचा सपोर्ट असलेल्या या ईअरबड्सच्या दोन्ही स्टेममध्ये 40-40 mAh ची बॅटरी आहे, तर याच्या चार्जिंग केसमध्ये 400mAh क्षमतेची बॅटरी आहे. तुम्ही हे ईअरबड्स सिंगल चार्जवर 6 तास आणि चार्जिंग केससोबत 36 तासांपर्यंत वापरु शकतात. लेटेस्ट ईअरबड्सची साउंड क्वालिटी शानदार असल्याचा कंपनीचा दावा आहे.
Nokia Lite Earbuds किंमत :-
Nokia Lite Earbuds सध्या फक्त युरोपात लाँच झाले आहेत, मात्र लवकरच भारतातही हे ईअरबड्स लाँच होतील. ब्लॅक आणि पोलार सी अशा दोन रंगांच्या पर्यायात आलेल्या या ईअरबड्सची किंमत 39 युरो म्हणजे जवळपास 3400 रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 2:18 pm

Web Title: nokia lite earbuds with up to 36 hour battery life launched check price and specifications sas 89
Next Stories
1 बंपर ऑफर! प्रीमियम स्मार्टफोनवर तब्बल ४० हजार रुपये डिस्काउंट, फ्लिपकार्टवर भन्नाट ‘सेल’
2 तब्बल 6000mAh बॅटरी, ‘स्वस्त’ Samsung Galaxy F12 चा पहिलाच ‘सेल’
3 Clubhouse च्या १३ लाख युजर्सचा डेटा झाला लीक? रिपोर्टमध्ये दावा
Just Now!
X