05 March 2021

News Flash

स्तनाच्या कर्करोगावर ग्रीन सलाडचा ‘कोम्बो’ उपचार

हळद, काही निवडक भाज्या, फळे आणि वनस्पतींच्या मुळ्या यांच्या पासून तयार केलेल्या 'कोम्बो' सलाडच्या सेवनातून नैसर्गिक संयुगे निर्माण होतात.

| November 29, 2013 05:07 am

हळद, काही निवडक भाज्या, फळे आणि वनस्पतींच्या मुळ्या यांच्या पासून तयार केलेल्या ‘कोम्बो’ सलाडच्या सेवनातून नैसर्गिक संयुगे निर्माण होतात. ही संयुगे स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींचा खात्माकरण्यास उपकारक असल्याचे एका अभ्यासातून सिध्द झाले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील या संशोधन गटाचे नेतृत्व एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाकडे आहे. या संयुगांमुळे सामान्य पेशींना कोणताही अपाय होत नसल्यामुळे हा एक नैसर्गिक उपाय आहे.
लुईझियाना राज्य विद्यापीठ आरोग्य विज्ञान केंद्रामध्ये प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ प्राध्यापक माधवा राज यांच्या नेतृत्वाखाली स्तनाच्या कर्करोगावर संशोधन सुरू आहे. या संशोधना दरम्यान ‘कोम्बो’पासून तयार होणाऱ्या संयुगांनी कर्करोगाच्या पेशींचा १०० टक्के खात्मा केल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
“केवळ थेरपी टाळल्यामुळे स्टेम पेशींचा एक लहान गट स्तनाच्या कर्करोग्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे,” असे माधवा राजा म्हणाले.
“या उपचार पध्दतीमध्ये कर्करोगाच्या पेशींना प्रतिरोधकरणाऱ्या नव्या पेशींची मोठ्याप्रमाणावर निर्मिती होते. या उलट मल्टी ड्रग थेरपीमुळे कर्करोगाच्या नव्या गाठी तयार होण्याची शक्यता असते. म्हणून कर्करोगाचा अधिक प्रभावी आणि सुरक्षित उपचार किंवा प्रतिबंध करण्यासाठी नवीन उपचार पध्दतींचा विकास करणे महत्त्वाचे आहे,” असे माधवा राजा यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 5:07 am

Web Title: now combo of plant nutrients to kill breast cancer cells
टॅग : Lifestyle News
Next Stories
1 साखरयुक्त पेयांमुळे गर्भाशयाचा कर्करोग
2 मेंदूच्या विकासात मांस, अंडी, दुध महत्त्वाचेच
3 ‘जुळय़ा’चे दुखणे!
Just Now!
X