News Flash

Corona Vaccine सेंटरची माहिती आता Whatsapp वर मिळवा, ‘या’ नंबरवर करा फक्त एक मेसेज

फक्त एक मेसेज करुन घरबसल्या मिळवा लसीकरण केंद्राबाबतची सविस्तर माहिती

भारतात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे, त्यासोबतच देशात लसीकरणालाही सुरूवात झालीये. जर तुम्ही अजूनही करोनाची लस घेतली नसेल तर आता तुम्ही घरबसल्या जवळच्या करोना लसीकरण केंद्राबाबतची ( Corona Vaccine Centre)माहिती मिळवू शकता. जवळच्या लसीकरण केंद्राचा पत्ता माहिती नसेल तर आता तुम्ही फेसबुकच्या इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर चॅटिंग करुनही त्याबाबतची सविस्तर माहिती मिळवू शकणार आहात. याबाबत सविस्तर जाणून घेऊया –

MyGovIndia ने ट्विटरद्वारे दिली माहिती :-
MyGov इंडियाच्या करोना हेल्पडेस्कने या फिचरबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. यानुसार आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही तुमच्या जवळील लसीकरण केंद्राबाबतची माहिती मिळवू शकतात. MyGov Corona Helpdesk चॅटबॉट गेल्या वर्षी लाँच झाला असून याला हिंदी आणि इंग्रजी भाषेचा सपोर्ट आहे. आता स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कशी मिळेल लसीकरण केंद्राबाबतची माहिती :


– WhatsApp वर करोना लसीकरण केंद्राबाबत माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला पहिले +91-9013151515 हा क्रमांक फोनमध्ये सेव्ह करावा लागेल.

-यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करुन सेव्ह केलेल्या त्या क्रमांकावर Namaste असा मेसेज पाठवा.

-नंतर एक ९ पर्यायांचा रिप्लाय येईल.

-त्यापैकी लसीकरणाबाबतच्या माहितीसाठी तुम्हाला 1 लिहून पाठवावा लागेल.

-त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय मिळतील. यापैकी केंद्राबाबतच्या माहितीसाठी पुन्हा 1 लिहून पाठवावा लागेल.

-यानंतर तुम्हाला तुमचा पिन कोड विचारला जाईल, पिन कोड पाठवताच तुमच्या जवळ असलेल्या सर्व लसीकरण केंद्राबाबतची माहिती मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:22 pm

Web Title: now find nearest covid 19 vaccination centre using mygov whatsapp chatbot check details sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाग झाला ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन Micromax In Note 1, कंपनीने वाढवली किंमत
2 मध्यरात्रीपासून Samsung Galaxy M42 5G ची विक्री सुरू, ‘मिडरेंज’ 5G स्मार्टफोनमध्ये शानदार फिचर्स
3 2,500 रुपयांनी स्वस्त झाला 5000mAh बॅटरीचा शानदार Oppo A53, जाणून घ्या डिटेल्स
Just Now!
X