05 July 2020

News Flash

आता स्क्रीनशॉटद्वारे करता येणार Google Search

स्क्रीनशॉटशी संबंधित माहिती सर्च करता येणार

(सांकेतिक छायाचित्र)

गुगलवर लवकरच स्क्रीनशॉटद्वारे इमेज शोधता येणं शक्य होणार आहे. या फीचरची गुगलकडून चाचणी सुरू असल्याचं वृत्त आहे. याद्वारे युजरने आपल्या स्मार्टफोनवरून स्क्रीनशॉट घेतल्यास त्याला गुगल सर्च हा पर्याय हा पर्याय दर्शवला जाईल. 9to5 google या टेक पोर्टलने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

गुगल अॅपच्या नव्या अपडेटमध्ये म्हणजेच 10.61 व्हर्जनमध्ये ‘स्मार्ट स्क्रीनशॉट्स’ नावाचा एक नवा पर्याय असेल. याद्वारे युजरने आपल्या स्मार्टफोनवरून स्क्रीनशॉट घेतल्यास त्याला गुगल सर्च हा पर्यायदेखील दर्शविण्यात येईल. यावर क्लिक केल्यास त्या स्क्रीनशॉटशी संबंधित माहिती सर्च करता येईल असं सांगितलं जात आहे. पण, नेमकं कशाप्रकारे हे फीचर कार्यान्वित असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अजून हे फीचर प्रयोगात्मक अवस्थेत असून सध्या फीचरला निवडक युजर्ससाठीच सादर करण्यात आले आहे, अपडेटनंतर सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येण्याची शक्यता असल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

गुगलने यापूर्वीच इमेजच्या सहाय्याने सर्च करण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता स्क्रीनशॉटच्या मदतीने सर्चचं फीचर आल्यास युजर्ससाठी ते अजून सोयीस्कर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 9:07 am

Web Title: now google may soon let you search with a screenshot sas 89
Next Stories
1 VIDEO: जाणून घ्या पाकिस्तावर भारी पडणाऱ्या घातक ‘अस्त्रा’बद्दल
2 अबब! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटो फ्रेमचा तब्बल १ कोटी रुपयांना लिलाव
3 मोदींना ‘फादर ऑफ कंट्री’ म्हणत मिसेस सीएमकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
Just Now!
X