नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) UPI AutoPay हे नवीन फीचर जारी केलं आहे. UPI AutoPay फीचरमुळे ग्राहकांना दर महिन्याला न चुकता त्यांच्या बिलाच्या रक्कमेचा भरणा करता येणार आहे. युपीआय ऑटो-पे या फीचरद्वारे युजर्स दर महिन्याला आपोआप ‘पेमेंट’ करु शकतात. याअंतर्गत दर महिन्याला 2,000 रुपयांपर्यंत पेमेंट आपोआप होतं, पण त्यापेक्षा जास्त पेमेंटसाठी युजर्सना युपीआय पिन टाकावा लागेल.

UPI AutoPay अंतर्गत ग्राहकाने ‘फिक्स’ केलेली रक्कम आपोआप कट होते. या फीचरचा वापर करण्यासाठी ग्राहकांना e-mandate बनवावं लागेल. हे काम UPI ID आणि QR कोड स्कॅन करुन करता येतं. युपीआय ऑटो-पे फीचरमध्ये नेहमी पेमेंट करण्यासाठी ऑटो डेबिट अकाउंट आहे. युजर हा पर्याय निवडू शकतात. यामध्ये असलेल्या मँडेट सेक्शनमध्ये ऑटो डेबिट सेक्शनबाबत पर्याय आहेत, तसेच ऑटो डेबिट हटवण्याचा पर्यायही इथे आहे.


अनेक बँकांनी आणि कंपन्यांनी युपीआय ऑटो-पे फीचरचा वापर केला सुरू :-
दोन हजारापेक्षा कमी पेमेंटसाठी आता ग्राहकांना त्यांचं अकाउंट फक्त एकदा युपीआय पिनसोबत Authenticate करावं लागेल. यानंतर दरमहिन्याला 2000 रुपयांपर्यंतच पेमेंट आपोआप होईल. पण 2000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी युपीआय पिन टाकावा लागेल. NPCI ने अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, एचएसबीसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, पेटीएम पेमेंट बँक, ऑटो-पे दिल्ली मेट्रो, ऑटो पे-डिश टीव्ही, सीएएमएस-पे, फर्लन्को, ग्रोफिटर, पॉलिसी बाजार, टेस्टबुक.कॉम, द हिंदू, टाइम्स प्राइम, पेटीएम, पेयू, रेजर-पेसाठी युपीआय ऑटो-पे फीचर सुरू केलं आहे. यस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जिओ पेमेंट्स बँक लवकरच याचा वापर सुरू करणार आहेत. यामुळे ग्राहकांना दर महिन्याला न चुकता त्यांच्या बिलाच्या रक्कमेचा भरणा करता येणार आहे. UPI AutoPay चा वापर मोबाइल रिचार्ज, मेट्रो कार्ड पेमेंट, वीज बिल, EMI,म्यूचुअल फंड, अशा अनेक ऑनलाइन व्यवहारांसाठी करता येतो. गेल्या काही वर्षांपासून भारतात डिजिटल ट्रांजेक्शनसाठी युपीआय लोकप्रिय पर्याय ठरत आहे.