वजन जास्त असणाऱया व्यक्तींना अर्धशिशी होण्याची शक्यता अधिक असते, असे एका संशोधनातून आढळून आले आहे. सर्वसाधारण वजन असणाऱयां व्यक्तींपेक्षा जास्त वजन असणाऱया व्यक्तींना अर्धशिशी होण्याची शक्यता ८१ टक्क्यांनी अधिक असते. 
अर्धशिशी आजार असणाऱया व्यक्तीला महिन्यातून १४ किंवा त्यापेक्षा कमीवेळा त्याचा त्रास होतो. ज्या व्यक्तींना गंभीर अर्धशिशीचा आजार असतो, त्यांना महिन्यातून १५ वेळा हा त्रास होतो, असे आढळून आले. ज्या व्यक्तींचे वजन जास्त असते, त्यांना अर्धशिशीचा त्रास अधिक प्रमाणात असल्याचे आढळते. ज्यांचे वजन कमी असते, त्यांच्यामध्ये हा आजार विशेष प्रमाणात आढळून येत नाही.
बाल्टीमोरमधील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे प्राध्यापक बी. ली पेटरलीन यांच्या नेतृत्त्वाखाली हे संशोधन करण्यात आले. यासंदर्भात याआधी झालेल्या संशोधनामध्ये अर्धशिशीचा गंभीर आजार असणाऱी व्यक्ती आणि तिचे वजन यांचा संबंध असल्याचे आढळून आले होते. मात्र, कमी स्वरुपात अर्धशिशीचा त्रास होणाऱया व्यक्ती आणि त्यांचे वजन याचाही काही संबंध आहे का, यावरून संशोधकांमध्ये एकमत नसल्याचे पेटरलीन यांनी सांगितले.