22 October 2020

News Flash

भारतात फिरण्यासाठीची ५ ‘ऑफ बीट’ ठिकाणं

उत्तुंग पहाड ते घनदाट अरण्यांपर्यंत अनेक 'ऑफ बीट' ठिकाणं प्रवाशांची वाट पाहात आहेत.

हिरवी नारळाची झाडं आणि सोनेरी वाळू यांनी नेय्यर नदीचा परिसर सुरेख दिसतो.

भारतात भरपूर वैविध्यता आहे आणि बहुतांश भाग अनेक उत्सुक प्रवाशांनी देखील पाहिलेला नसेल. उत्तुंग पहाडांपासून सुरेख तळी आणि घनदाट अरण्यांपर्यंत अनेक ‘ऑफ बीट’ ठिकाणं प्रवाशांची वाट पाहात आहेत.

‘ऑफ बीट’ मार्गांची ही पाच ठिकाणं :

बैगुनी, सिक्किम – बैगुनी हा सिक्किमेच्या पश्चिमेकडील सुंदर डोंगराळ भाग आहे. कांचनजुंगा येथे सूर्योदय पाहता येईल, येथे पक्षी आणि तळ्यांचे सौंदर्य न्याहाळता येईल, बैगुनीमध्ये निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच आहे. पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग, माउंटेन कँपिंग, व्हिलेज ट्रेकिंग यासारख्या अनेक गोष्टी येथील वास्तव्यात करताय येतील.

बिनसर, उत्तराखंड – वन्यजीवप्रेमींसाठी बिनसर म्हणजे स्वर्गच. बिनसर हे वन्यजीवांचे घरच आहे, येथे हरणं, जंगली बोकड, उडत्या खारी आणि इतर अनेक दुर्मीळ प्राणी राहतात. बिनसरमध्ये पंच्चुली, शिवलिंग, चौखांबा, त्रिशुल आणि नंदादेवी असा ३०० किमीचा ‘पॅनोरॅमिक व्ह्यू’ आहे. येथे तुम्हाला भटकंती, गावातील भटकंती, ट्रेकिंग आणि पक्षीनिरीक्षण आदी गोष्टी करता येतील

पूवर, केरळ – नदीच्या रुंद मुखासह असलेले हे बेट आहे, पूवर म्हणजे केरळमधील त्रिवेंद्रम जिल्ह्यातील स्वर्गच आहे. पूवरला नेय्यरचा वेढा आहे, त्रिवेंद्रमजवळील अगस्तीयरकूदमचे मूळ आणि अरबी समुद्रचा शेवट अशा ठिकाणी पूवर वसलेले आहे. हिरवी नारळाची झाडं आणि सोनेरी वाळू यांनी नेय्यर नदीचा परिसर सुरेख दिसतो. येथील बॅकबॉटर क्रूज म्हणजे अप्रतिम सौंदर्याची खाणच होय.

मदिकेरी, कर्नाटक – कूर्ग (कोडागु) जिल्ह्यात मुख्यालय असलेले हे हिल स्टेशन आहे, मदिकेरी हे कर्नाटकातील सर्वात सुंदर ठिकाण आहे, डोंगररांगा, हिरवीगार शेतं, कॉफीची शेती आणि केशरी ऑर्चड म्हणजे पर्वणीच. येथील नदीचे खळाळते पाणी म्हणजे निसर्गदत्त देणगीच. अॅबे वॉटरफॉल, मंडालपट्टी, छेलावारा धबधबा, कोटेबेट्टा यासारखी सुंदर प्रेक्षणीय स्थळे येथे आहेत.

कुंभलगढ, राजस्थान – कुंभलगढपेक्षा अधिक चांगलं ते काय असू शकतं, राजे-महाराजांची ‘रॉयल लाइफस्टाईल’ पाहण्याची ही एक संधी आहे. राजस्थानातील राजसअमंद जिल्ह्यातील हे शहर म्हणजे ‘वर्ल्ड हेरिटेज साइट’ आहे, कुंभलगढ ही फोटोग्राफर्स आणि वन्यजीवप्रेमींसाठी उत्तम जागा आहे. कुंभलगढ किल्ला ३६ किमीचा आहे आणि राजस्थानातील सर्वात महत्त्वाचा व दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला आहे. कुंभलगढ वाइल्डलाईफ सँच्युअरी, बादल महार, मम्मादेव मंदीर ही या शहरातील इतर आकर्षक स्थळे आहेत.

‘अनएक्सप्लोअर्ड’ ठिकाणी प्रवास करण्यात भारतीयांना आवड निर्माण होऊ लागली आहे आणि यात वाढ होताना दिसते आणि पर्यटनाबाबत ते प्रयोगशील असल्याचा आपला अनुभव असल्याचे ‘महिंद्रा हॉलिडेज आणि रिसॉर्ट इंडिया लिमिटेड’ (एमएचआरआयएल)चे प्रमुख वितरण अधिकारी गिरिधर सिथाराम यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 1:12 pm

Web Title: offbeat destinations in india
Next Stories
1 खई के पकोडम पोर्तुगीजवाला!
2 मेंदूत कॅल्शियम वाढल्याने कंपवाताचा धोका
3 पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ आसन करा
Just Now!
X