News Flash

Ola भारतात लवकरच लाँच करणार Electric Scooters, कमी किंमतीत शानदार मायलेज

काही दिवसांपूर्वीच Ola ने भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची घोषणा केली होती

कॅब सेवा पुरवणारी कंपनी ओला (Ola) भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय कंपनी भारतात मॅन्यूफॅक्चरिंग हब बनवण्यासाठीही प्रयत्नशील आहे.

काही दिवसांपूर्वीच ओलाने भारतात लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची घोषणा केली होती. पुढील वर्षी जानेवारीमध्ये ओला भारतात पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ओलाने नेदरलँड्सची कंपनी Etergo BV चे अधिग्रहण केले असून ही कंपनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी मदत करणार आहे.

मायलेज जबरदस्त :-
कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या स्कूटर बनवण्यावर ओलाचा भर असणार आहे. त्यात Etergo BV ने एकदा चार्ज केल्यानंतर २४० किलोमीटरपर्यंतचं अतंर कापू शकणारी स्कूटर बनवली आहे. त्यामुळे भारतातही कमी किंमतीत शानदार मायलेज देणारी स्कूटर लाँच करण्याचा ओलाचा प्रयत्न असणार आहे. भारतात सध्या २० मिलियन म्हणजेच २ कोटी स्कूटर आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला भविष्यातील गाडी मानलं जात आहे. भारतात पहिली स्कूटर लाँच केल्यानंतर एका वर्षात १० लाख इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करण्याचे कंपनीने लक्ष्य ठेवले आहे.

भारतात मॅन्यूफॅक्चरिंग हब :-
सध्या Etergo BV च्या प्रकल्पातच ओला इलेक्ट्रिक स्कूटरचं प्रोडक्शन घेतलं जाईल. पण, कमी खर्च लागावा यासाठी पूर्णपणे भारतातच इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यावर ओलाचा भर असणार आहे. यासाठी ओला भारतातच मॅन्यूफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी अनेक राज्य सरकारशी चर्चा करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 4:54 pm

Web Title: ola electric scooters to be launched in india in january 2021 get all the details sas 89
Next Stories
1 250 रुपयांपेक्षा कमी किंमतीत दररोज 3GB डेटा, BSNL चा भन्नाट प्लॅन
2 PUBG Mobile India च्या वेबसाइटवर आली गेमची डाउनलोड लिंक, पण…
3 WhatsApp वर आला Disappearing Messages पर्याय; जाणून घ्या कसं सुरु करावं हे फिचर
Just Now!
X