सोशल नेटवर्किंगवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या सोशल नेटवर्किंगवर सगळ्यात चर्चेचा विषय आहे तो आपण म्हातारपणी कसे दिसू यासंदर्भातील फोटोंचा ट्रेण्ड. मुळात हा ट्रेण्ड अचानक व्हायरल होण्यामागील कारण आहे फेसअॅप.

डिजीटल युगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. म्हणजे जुने फोटो रंगीत करण्यापासून नसलेल्या फोटोमध्ये व्यक्तीचा समावेश करण्यापर्यंत अनेक गोष्टी आज तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य आहेत. त्यातही अनेक अॅप्सच्या मदतीने फोटो एडीट करुन ते व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. असाच एक ट्रेण्ड सध्या दिसून येत आहे तो म्हणजे तरुणांनी त्यांच्या भविष्यातील शेअर केलेला लूक. फेसअॅप वापरुन अगदी सेलिब्रिटीजपासून सामान्यांपर्यंत अनेकजण भविष्यात डोकावून आपण खरचं काही वर्षांनी कसे दिसू हे तपासून पाहत असून ते फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करत आहेत.

काय आहे फेसअॅप

फेसअॅप हे २०१७ साली लॉन्च करण्यात आले होते. अॅप लॉन्च झाल्यानंतरही ते चांगलेच चर्चेत आले होते. सध्या हे अॅप अचानक चर्चेत आले आहे. मुळात अचानक हे अॅप वापरणाऱ्यांचे आणि त्यावरील फोटो व्हायरल होण्याचे नक्की कारण काय आहे हे समोर आले नसले तरी हजारोच्या संख्येने नेटकरी हे अॅप वापरुन त्यांच्या म्हातारपणीचा लूक शेअर करताना दिसत आहेत. खरं तर या अॅपमध्ये इन्स्टाग्रामप्रमाणे अनेक फिल्टर्स आहेत मात्र त्यातील ओल्ड फेस फिल्टर खूपच लोकप्रिय झाले असून या फिल्टरचा वापर करुनच अनेकजण भविष्यातील स्वत:कडे पाहत आहेत. हे फिल्टर मोफत असल्याने अनेकजण ते ‘ट्राय करुन तर बघू’ म्हणत वापरुन पाहताना दिसत आहेत. या अॅपमध्ये अनेक फिल्टर आहेत. म्हणजे तरुण रुप पाहण्यासाठीचे फिल्टर, केसांचा रंग बदलण्याचे, चेहऱ्यावर मेकअप करण्याचे तसेच क्रूर हास्य चेहऱ्यावर आणण्याचेही फिल्टर या अॅपमध्ये आहे.

कसं काम करतं फेसअॅप

आर्टिफिशियल (एआय) इंटेलिजन्स अल्गोरिदमवर हे अॅप काम करते. एआयच्या मदतीने युझर्सचा चेहरा काही वर्षांनी कसा दिसेल याचा अंदाज अॅप लावते. त्यानुसार युझरच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, सुकलेले डोळे, चेहऱ्यावरील केस, काही ठिकाणी डाग आणि चेहऱ्यावरील इतर बारीकसारीक बदल केले जातात आणि काही वर्षांनंतरचा युझरचा ‘ओल्ड’ व्हर्जनमधील फोटो तयार होतो. एआयचा वापर करुन हे अॅप काम करत असल्याने तयार होणारा फोटो हा कार्टून किंवा चित्र न वाटता युझर्सचाच काही वर्षानंतर काढलेला फोटो वाटतो.

गुगल प्लेवर फेसअॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे वाचा

आयफोनवर हे अॅप डाऊनलोड करायचे असल्यास येथे पाहा.