News Flash

200Mbps चा स्पीड आणि 300GB डेटा, एअरटेलचा शानदार प्लॅन

एकाच प्लॅनमध्ये पोस्टपेड, डीटीएच, ब्रॉडबँड आणि लँडलाइन सर्व्हिसचीही मजा...

जर मोबाइल, डीटीएच आणि ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शनसाठी वेगवेगळे रिचार्ज करुन वैतागला असाल तर, Airtel ने काही दिवसांपूर्वी आपल्या ग्राहकांसाठी खास One Airtel प्लॅन्स आणले आहेत.   ‘One Airtel’  प्लॅनमध्ये कंपनीकडून एकाचवेळी पोस्टपेड, डीटीएच, ब्रॉडबँड आणि लँडलाइन सर्व्हिसची ऑफर दिली जाईल. विशेष म्हणजे सर्व सेवांचं एकच बिल ग्राहकांना येतं. ‘वन एअरटेल’अंतर्गत कंपनीकडे 899 रुपये, 1349 रुपये, 1499 रुपये आणि 1999 रुपये असे चार प्लॅनचे पर्याय आहेत. सर्व प्लॅन्समध्ये वेगवेगळे फायदे मिळतात.  सविस्तर जाणून घेऊया कंपनी या प्लॅनमध्ये काय बेनिफिट्स देणार आहे आणि युजर्ससाठी कोणता प्लॅन बेस्ट ठरु शकतो.

आणखी वाचा : (Airtel Independence Day Offer : फ्री मिळेल तब्बल 1000 जीबी अतिरिक्त डेटा, जाणून घ्या डिटेल्स)

काय आहे वन एअरटेल प्लॅन –
सध्या एअरटेल कंपनी टेलिकॉमशिवाय एअरटेल डिजिटल टीव्हीमार्फत डीटीएच आणि एक्सट्रीम फायबरची 1Gbps स्पीडपर्यंत इंटरनेट सर्व्हिस देते. या सर्व सेवांसाठी युजर्सना वेगवेगळे सब्सक्रिप्शन किंवा रिचार्ज करावे लागते. पण, आता कंपनीने वन एअरटेल प्लॅनमध्ये सर्व सर्व्हिस एकत्र ऑफर करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्लॅनसाठी सब्सक्राइब करणारे युजर आता एकाच प्लॅनमध्ये चारही सेवांचा लाभ घेवू शकतात.

वन एअरटेलचा 1,499 रुपयांचा प्लॅन-
वन एअरटेल  1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी दोन पोस्टपेड कनेक्शनसोबत एक ब्रॉडबँड फाइबर आणि एक लँडलाइन कनेक्शनची ऑफर देत आहे. दोन्ही पोस्टपेड कनेक्शनमध्ये एकूण 75जीबी डेटा मिळेल. याशिवाय देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येईल. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या ब्रॉडबँड कनेक्शनमध्ये 200Mbps च्या स्पीडने 300GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये ब्रॉडबँड आणि पोस्टपेड कनेक्शन बिल एकत्र होतं.

1,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये डीटीएच कनेक्शन-
वन एअरटेल 1999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 75जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसोबत एकूण 3 पोस्टपेड कनेक्शन मिळतात. फ्री लँडलाइन कनेक्शनसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये ब्रॉडबँड कनेक्शनमध्ये युजर्सना 200Mbps च्या स्पीडने एकूण 300GB डेटा मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये डीटीएच कनेक्शनचीही ऑफर आहे. यात एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्ससह 424 रुपये किंमतीचे टीव्ही चॅनेल्स बघायला मिळतील.

वन एअरटेल 1349 रुपये आणि 899 रुपये –
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये युजर्सना 4 पोस्टपेड कनेक्शन मिळतात. यात एकूण 150जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ ग्राहकांना मिळेल. तर, डीटीएच कनेक्शनमध्ये एक्स्ट्रीम बॉक्ससह 350 रुपये किंमतीचे टीव्ही चॅनेल्स बघता येतील. याशिवाय कंपनीकडे 899 रुपयांचा सर्वात स्वस्त वन एअरटेल प्लॅन आहे. यामध्ये एकूण 75जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसोबत दोन पोस्टपेड कनेक्शन मिळतात. या प्लॅनमध्ये एक्स्ट्रीम बॉक्ससह डीटीएच कनेक्शन आणि 350 रुपये किंमतीचे टीव्ही चॅनेल्स बघता येतील.

आणखी वाचा : (Airtel Independence Day Offer : फ्री मिळेल तब्बल 1000 जीबी अतिरिक्त डेटा, जाणून घ्या डिटेल्स)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 12:44 pm

Web Title: one airtel 1499 plan provides 300gb broadband data at 200 mbps speed check details sas 89
Next Stories
1 पाच कॅमेऱ्यांच्या ‘बजेट’ स्मार्टफोनचा ‘सेल’, किंमत 10 हजारांहून कमी
2 Jio ने आणली जबरदस्त ऑफर , मिळेल 5 महिने फ्री डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगही
3 दर महिन्याच्या 17 तारखेला मिळणार शानदार ऑफर्स, ‘वनप्लस’ने केली Red Cable Day ची घोषणा
Just Now!
X