आपण दिर्घकाळ तरुण दिसावे आणि लवकर म्हातारे होऊ नये असे अनेकांना वाटते. पण यासाठी नेमके काय करावे याबाबत त्यांना पुरेशी माहिती नसते. मग चेहऱ्यावरील सुरकुत्या लपविण्यासाठी सौंदर्यप्रसाधनांचा वापर, तर कधी तरुण दिसण्यासाठी हेअरकट किंवा वेगळ्या प्रकारचे कपडे यांचा आधार घेतला जातो. पण आहारात काही मुलभूत बदल केल्यास तुम्ही नकळत दिर्घकाळ तरुण राहता. यामध्ये ठराविक पदार्थ आहारातून वर्ज्य करणे हा एक महत्त्वाचा उपाय असल्याचे काही आहाकतज्ज्ञांकडून सांगण्यात येते. आता हे पदार्थ नेमके कोणते आणि वय वाढलेले दिसण्यामध्ये ते कसे अडथळा ठरतात याविषयी…

गोड पदार्थ

mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

जास्त प्रमाणात साखर शरीरात जाण्याने त्वचेत असणाऱ्या एका घटकाला हानी पोहोचते. त्वचेच्या लवचिकतेवर त्याचा परिणाम होतो. गोड पदार्थांमधील या घटकामुळे तुमची त्वचा सैल होते आणि तुम्ही लवकर वयस्कर दिसायला लागता.

फ्रेंच फ्राईज

फ्रेंचफ्राईज, वेफर्स यांसारखे पदार्थ तेलात पूर्ण तळून काढलेले असतात. त्याचा तुमचे वय दिसून येण्यावर परिणाम होतो. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळलेले किंवा कमी केलेले चांगले. तळल्यामुळे या पदार्थांमध्ये स्निग्धतेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे तुम्हाला हृदयविकार आणि त्वचाविकार होण्याची शक्यता असते.

बेकरी प्रॉडक्टस

पेस्ट्री, केक आणि कुकीज यांसारखे पदार्थ बेकरी प्रॉडक्ट्समध्ये येतात. हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर तुमची त्वचा वयस्कर झाल्याचे दिसते. हे पदार्थ जास्त खाल्ल्यास शरीरात जळजळ होण्याचीही शक्यता असते आणि त्याचा त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे हे पदार्थ अगदी कमी खावेत.

मद्यपान

अनेकांना नियमित मद्यपान करण्याची सवय असते. मद्यपानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्वचा काहीशी सैल होऊन चेहऱ्यावर आणि शरीरावर सुरकुत्या वाढण्यास सुरुवात होते आणि व्यक्ती वयस्कर दिसण्यास मदत होते.

कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ

कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ आहारात जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. कार्बोहायड्रेटस जास्त असणाऱ्या पदार्थांमधील कोलेजन आणि फायबर हे पदार्थ त्वचेवर परिणाम करतात. त्यामुळे व्यक्ती वयस्कर दिसायला लागते.